पिंपरी-चिंचवड

पुण्याच्या वाहतुकीला मिळणार ‘मेकओव्हर’

CD

पुण्याच्या वाहतुकीला मिळणार ‘मेकओव्हर’
- श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, पुणे मेट्रो

पुणे महानगर प्रदेशाला अधिक राहणीमानयोग्य, शाश्वत आणि नागरिकाभिमुख महानगर बनविण्याच्या दिशेने अनेक प्रयत्न केले जात आहेत. यात प्रामुख्याने सार्वजनिक वाहतूक सुविधा आणखी सक्षम करणे, रस्त्यांचे जाळे विस्तारणे, मेट्रो आणि पीएमपीएमएल सेवेचा विस्तार अशा घटकांना प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी पुढील ३० वर्षांचे नियोजन करण्यात आले आहे.
-------------
पुणे एकीकृत महानगर वाहतूक प्राधिकरणाच्या (पुम्टा : पीयूएमटीए) मार्गदर्शनाखाली महामेट्रोने बनविलेली ‘सर्वसमावेशक गतिशीलता योजना’ (सीएमपी) तयार झाली आहे. यात २०५४ पर्यंतचा ३० वर्षांचा ठोस ‘रोडमॅप’ आखला आहे. या माध्यमातून पुणे महानगर प्रदेशाला अधिक राहणीमानयोग्य, शाश्वत आणि नागरिकाभिमुख महानगर बनविण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकण्यात आले आहे. या योजनेत एकात्मिक भू-उपयोग आणि वाहतूक नियोजन, अखंड बहुविध वाहतूक जोडणी तसेच पर्यावरणहानी कमी करण्यावर विशेष भर दिला आहे. सध्याच्या २० ते २२ टक्क्यांवरून २०५४ पर्यंत सार्वजनिक वाहतुकीचा वाटा ५० टक्के करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. ही योजना तीन टप्प्यांत राबवली जाणार आहे. एकीकरण, शाश्वतता आणि सर्वसमावेशकता हे तिचे मुख्य वैशिष्ट्ये आहेत. याची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास भारतातील महानगरीय वाहतूक नियोजनासाठी ही योजना नवे ‘बेंचमार्क’ ठरेल.

मेट्रोचा विस्तार
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांत मेट्रो सेवा सुरू करण्याचा निर्णय २०१८ मध्ये झाला. सुरुवातीला पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या १६.५९ किलोमीटर लांबीच्या दोन मार्गांना मंजुरी मिळाली. सध्या दोन्ही मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. या सेवेने १० कोटी प्रवासी वाहतुकीचा टप्पा नुकताच ओलांडला आहे. मेट्रोला पुणेकरांनी पसंती दिली आहे. आता अनेक मार्गांवर मेट्रो सेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. सध्याच्या कार्यरत आणि बांधकाम सुरू असलेल्या मार्गांव्यतिरिक्त तब्बल ३१२ किलोमीटर नवीन मेट्रो व मेट्रो-लाइट मार्ग विकसित केले जाणार आहेत.

‘बीआरटी’ला संजीवनी
पिंपरी चिंचवड शहरात नाशिक फाटा ते वाकड, निगडी ते दापोडी, सांगवी फाटा ते किवळे, काळेवाडी फाटा ते चिखली आणि दिघी ते आळंदी अशा ५० किलोमीटर मार्गावर ‘बीआरटी’ अर्थात बस रॅपिड ट्रान्झिट सेवा सुरू आहे. तर पुण्यात १९ किलोमीटर ‘बीआरटी’ मार्ग सुरू आहे. आता पुणे व पिंपरी चिंचवड शहरांत ८०.५ किलोमीटरचे नवीन ‘बीआरटी’ मार्ग, तर ४६.३ किलोमीटर उच्च वारंवारिता बस मार्ग विकसित होणार आहेत. मेट्रोला समांतर असलेल्या जुन्या ‘बीआरटी’ मार्गांची फेररचना केली जाईल. यातून सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा आणखी सक्षम करण्याचे धोरण आहे.

‘पीएमपीएमएल’चा ताफा चौपट वाढणार
पुणे आणि पिंपरी चिंचवडची प्रमुख सार्वजनिक प्रवासी सेवा असलेल्या ‘पीएमपीएमएल’च्या ताफ्यात लवकरच चार हजार नवीन बस दाखल होणार आहेत. २०५४ पर्यंत ही बससंख्या ११ हजार ५६४ पर्यंत नेण्याचा निर्धार आहे. यासोबत ६४१ किलोमीटरचे नवीन बस मार्ग, १२ विद्यमान बस टर्मिनसचा पुनर्विकास, ११ नवीन बस टर्मिनस, पाच डेपोंचा पुनर्विकास, १५ नवीन डेपो, सात आंतरराज्य बस टर्मिनसचा पुनर्विकास आणि पाच नवीन आंतरराज्य बस टर्मिनस उभारले जाणार आहेत.

रस्ते सुधारणा आणि कोंडीमुक्तीचे नियोजन
सार्वजनिक प्रवासी वाहतूक सुविधा हा शहराचा मुख्य कणा असला, तरी निवडक रस्त्यांची सुधारणादेखील अपरिहार्य आहे. यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांत ४३८ किलोमीटर रस्ते रुंदीकरण, ५५२ किलोमीटर मिसिंग लिंक, २९० किलोमीटर अंतर्गत-बाह्य रिंगरोड, १८ फ्लायओव्हर, २० रेल्वे उड्डाणपूल व भुयारी मार्ग आणि १९ नवीन नदीपूल बांधले जाणार आहेत. त्यादृष्टीने नियोजनही सुरू आहे. यातून कोंडीमुक्त वाहतुकीचे उद्दिष्ट आहे.

चालणे व सायकलिंगला प्रोत्साहन
पुणे महापालिका क्षेत्रात ३४१ किलोमीटर पदपथ व २३० किलोमीटर सायकल ट्रॅक आणि पिंपरी चिंचवडमध्ये २६६ किलोमीटर पदपथ व १७० किलोमीटर सायकल ट्रॅक विकसित केले जाणार आहेत. महत्त्वाच्या १६ ठिकाणी पादचारी पूल किंवा भुयारी मार्ग उभारले जातील. यातून नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासह सहज जाणे-येणे शक्य करण्याचा प्रयत्न आहे.

मालवाहतूक व लॉजिस्टिक्स सुधारणा
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांत प्रामुख्याने सकाळी आणि सायंकाळी मोठ्या संख्येने खासगी वाहने रस्त्यावर येतात. तसेच ‘एमआयडीसी’ परिसरात मालवाहतुकीची वाहने याचवेळी शहरातून जातात. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. हे पाहता निवासी भागात ट्रकची अनियंत्रित वर्दळ कमी करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश क्षेत्रात १४ ट्रक टर्मिनस, सात लॉजिस्टिक हब आणि संपूर्ण प्रदेशात २६ बहुविध वाहतूक हब (मल्टी-मोडल हब) विकसित केले जाणार आहेत.
ही योजना यशस्वी झाल्यास खासगी वाहनांच्या गर्दीत गुदमरलेली पुणे आणि पिंपरी चिंचवड ही शहरे २०५४ पर्यंत खरोखरच सुलभ, शाश्वत आणि पर्यावरणपूरक महानगरात रुपांतरित होतील, अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणने होर्मुझची सामुद्रधुनी केली पूर्ण बंद, जहाज पेटवून देण्याचा इशारा; तेलाच्या किंमतीचा भडका उडणार, आशियाई देशांना फटका

Latest Marathi News Live Update : हॉर्मुझ सामुद्रधुनीतील तणावाने तेलदरात उसळी

Dr. Janardan Waghmare : लातूर पॅटर्नचे शिल्पकार डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन; शिक्षण क्षेत्रातील एक देदीप्यमान पर्व संपले

Iran Israel War News : मध्यपूर्वेत महायुद्ध पेटले! इराणचा इस्रायलवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला; अमेरिकेचे 'ऑपरेशन एपिक फ्युरी' सुरू, ५५५ जणांचा मृत्यू

Supreme Court: न्यायाधीशांनी AI चा वापर करून लिहिला निकाल, अस्तित्वातच नसलेल्या खटल्यांचा संदर्भ; सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?

SCROLL FOR NEXT