चिंचवड लिंक रोड येथील माणिक कॉलनी, तिळकुंड गणपती बाग परिसरात गेल्या चार महिन्यांपासून ‘मेरी-गो-राउंड’ अर्धवट तुटून धोकादायक स्थितीत उभे आहे. लहान मुले त्याच्या खाली जाऊन खेळत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांचे याकडे अजूनही लक्ष नाही.
- सी. व्ही. पै, चिंचवड
PNE25V71080
---
बेवारस वाहनांवर कारवाई करा
पिंपळे गुरव येथील रामनगर मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून एक बेवारस चारचाकी वाहन उभे असून, त्यावर मोठ्या प्रमाणात झाडांचा पालापाचोळा, माती आणि धूळ साचली आहे. नागरिकांनी वारंवार महापालिका आरोग्य विभाग आणि वाहतूक पोलिसांना कळवूनही फक्त आश्वासने मिळाली. बेवारस वाहनांमुळे सफाई कामगारांना स्वच्छता करताना अडचणी येतात, तरी या वाहनावर तातडीने कारवाई करावी.
- एक वाचक, नवी सांगवी
PNE25V71081
---
खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता
चिखली-पाटील नगर येथील ब्ल्यू डाइस सोसायटीसमोर पाण्याच्या टाकीजवळ मोठे खड्डे पडले असून, नागरिक व विद्यार्थ्यांना खड्डे चुकवत प्रवास करावा लागत आहे. येथे अपघाताची शक्यता वाढली आहे. पावसाळा संपूनही खड्डे बुजविण्यात आले नाहीत. तरी याठिकाणी उपाययोजना करण्यात यावी.
- पुष्पराज आंबरे, चिखली
PNE25V71082