पिंपरी-चिंचवड

एमआयडीसीचा पाणीपुरवठा आज बंद

CD

पिंपरी, ता. २६ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) मुख्य जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी उद्या गुरुवारी (ता. २७) पिंपरी चिंचवड आणि देहूरोड परिसरातील एमआयडीसीचा पाणीपुरवठा पूर्ण दिवस बंद राहणार असल्याची माहिती एमआयडीसीच्या स्थापत्य विभागाने दिली आहे.
जलवाहिनी स्थलांतराच्या कामासाठी गुरुवारी (ता. २७) सकाळी आठपासून ते शुक्रवारी (ता. २८) सकाळी आठपर्यंत एकूण २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड, देहूरोड, ओएफडीआर, भोसरी कासारवाडी, निगडी, सीएमई, आर अॅण्ड डी दिघी, व्हीएसएनएल या भागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता. २८) तसेच शनिवार (ता. २९) आणि रविवारी (ता. ३०) कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांतील नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन एमआयडीसी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: 'गौतम गंभीर हाय हाय...' भारताच्या पराभवानंतर प्रशिक्षकाच्या समोरच चाहत्यांची घोषणाबाजी; Video Viral

BE DUNE TEEN TRAILER: तीन बाळांच्या येण्याने बदलणार सगळ्यांची आयुष्य; 'बे दुणे तीन' चा ट्रेलर प्रदर्शित

Imran Khan Latest News: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची तुरुंगात हत्या? ; भेटायला गेलेल्या बहिणींना झाली मारहाण!

D-Mart Sale : महिन्याच्या शेवटी डीमार्टमध्ये सगळ्यांत मोठा सेल; कोणत्या वस्तू मिळणार जास्त स्वस्त? पाहा सर्व डिस्काउंट ऑफर्स

Latest Marathi News Live Update : पुण्यातील महिलेने केला पुरुषावर अत्याचार

SCROLL FOR NEXT