गिलबिले खून प्रकरण
पिंपरी, ता. २६ : व्यावसायिक नितीन गिलबिले यांच्या खून प्रकरणातील गूढ वाढले आहे. तीन संशयितांना अटक केल्यानंतर सूत्रधार म्हणून माजी नगरसेवक किसन ऊर्फ महाराज तापकीर यांचे नाव समोर आले आहे. दिघी पोलिसांनी त्यांचा संशयित आरोपींमध्ये समावेश केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी अमित जीवन पठारे (३५, रा. पठारे मळा, चऱ्होली), विक्रांत सुरेश ठाकूर (रा. सोळू, ता. खेड) आणि सुमीत फुलचंद पटेल (३१, रा. गायकवाड नगर, दिघी) या तिघांना अटक केली आहे. १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी अलंकापुरम रस्त्यावर गिलबिले आणि ओळखीच्या काही लोकांसह थांबले होते. त्यावेळी पठारे आणि ठाकूर फॉर्च्यूनर मोटारीतून कारमधून तेथे आले. त्यांनी नितीन गिलबिले यांना मोटारीत बसवून त्यांच्या डोक्यात जवळून गोळी झाडली. गिलबिले यांचा जागीच मृत्यू झाल्यानंतर आरोपी पसार झाले.
खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. मात्र चौकशीत तापकीर यांचे नाव आरोपींकडून समोर आल्याने तपासाची दिशा बदलली. नेमके कारण, संबंध, आर्थिक किंवा वैयक्तिक वाद, तसेच तापकीर यांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हस्तक्षेपाबाबत पोलिस सखोल तपास करीत आहेत. तापकीर यांचा शोध सुरू करण्यात आला असून दिघी पोलिसांनी त्यासाठी स्वतंत्र पथक तयार केल्याचे सांगण्यात येत आहे.
खुनानंतर आरोपी ताम्हिणी घाट परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तातडीने हालचाली करून विना नंबर प्लेटच्या मोटारीचा पाठलाग करून ठाकूर आणि पटेल यांना पकडले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटार आणि मोबाईल जप्त करण्यात आले. पठारे याला दिघी पोलिसांनी वाघोलीतून अटक केली. पटेल हा गोळीबाराच्या आधी व नंतरही आरोपींसोबत फिरत होता. त्यामुळे त्याचाही आरोपींमध्ये समावेश करण्यात आला, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली.
.........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.