पिंपरी-चिंचवड

ऊसतोड कामगारांत बिबट्याची भिती वाढली

CD

सोमाटणे, ता. २७ ः पवनमावळ पूर्व भागात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी आणि ऊसतोड कामगारांत भितीचे वातावरण असून दिवसरात्र पाळत ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
मागील दोन आठवड्यापासून गोडुंब्रे, दारुंब्रे, साळुंब्रे, शिरगाव, सांगवडे या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून त्यांची संख्या एकापेक्षा अधिक असण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या बिबट्याने अनेक ठिकाणी कुत्री फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत, तसेच वनविभागाच्या पाहणीत बिबट्या असल्याचे निष्पन्न झाले
आहे. सध्या संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा ऊसतोड हंगाम सुरु असून बिबट्याच्या वावराने ऊसतोड कामगार घाबरले आहेत. त्यातच रात्रीची थंडी वाढल्याने त्यांना घरांची दारे पूर्ण बंद करावी लागतात त्यामुळे गाय, बैल आदी जनावरे बाहेर असल्याने भीती वाढली आहे, प्रसंगी रात्री जागावेही लागते, असे ऊसतोड कामगारांनी सांगितले.


यापूर्वी सर्व ऊसतोड कामगार तोडणीसाठी पहाटे शेतात जात असत, पाच वाजण्याच्या सुमारास ऊस तोडणीच्या कामाला सुरवात होत होती, परंतु बिबट्याच्या भीतीने आम्ही शेतात उशिरा जात असून दिवस उगवल्यानंतर सकाळी सात नंतर कामाला सुरवात करावी लागते.
- राजेंद्र महाडीक, ऊसतोड कामगार


अन्नाच्या शोधात रात्री बिबट्याचा वावर शेतकऱ्यांच्या गोठ्यापर्यंत वाढला असून, काल तो साळुंब्रे येथे
आला होता. परंतु आमचे लक्ष असल्याने तो गोठ्याजवळ न येता शेतातून पसार झाला.
- दिलीप राक्षे, शेतकरी साळुंब्रे

शेतकऱ्यांना सुरक्षेबाबतच्या सर्व सूचना दिल्या असून शेतकऱ्यांनी शेतात जाताना काळजी घ्यावी वनविभागाच्या संपर्कात राहावे, वनविभाग कर्मचाऱ्यांचे पूर्ण लक्ष आहे.
- प्रकाश शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वडगाव मावळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Import India : गॅस संकट कमी होणार ! कतारहून भारतात आणला ४६,००० मॅट्रिक टन LPG; तब्बल 'इतके' लाख सिलिंडर्स भरणार

Chhatrapati Sambhajinagar News: लातूर-नांदेडला अवकाळी पावसानं झोडपलं, वीज कोसळून १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान

Latest Marathi News Live Update : स्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकमधील तीन आयव्हीएफ सेंटर रडारवर

Adani Group: अदानींबरोबर करार मोडला, ७५०० कोटी द्यावे लागणार? राज्याला भुर्दंड, तपासणी नाके बंद करण्यात अदानींच्या अटीचा अडथळा

Fake Currency Kolhapur : कोल्हापूर शहराच्या भरवस्तीत बनावट नोटा विक्रीचा प्रकार, लाखो रुपयांच्या काळाबाजार उघड

SCROLL FOR NEXT