पिंपरी-चिंचवड

किरकोळ कारणावरून तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न

CD

पिंपरी : गाडीला कट मारल्यानंतर हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून तरुणाचा गळा दाबून बेदम मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना थेरगाव फाटा येथे घडली. या प्रकरणी वरुण किशोर टोपणे (रा. एसकेएफ कॉलनी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कमलेश विठ्ठल बालघरे (रा. थेरगाव) व योगेश विठ्ठल बालघरे (रा. थेरगाव) यांना अटक केली आहे. तर इतर चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल आहे. आरोपीने फिर्यादीच्या गाडीला कट मारला. त्यानंतर फिर्यादीने हॉर्न दिल्याने आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली. कमलेश याने आपण गाववाला असल्याचे सांगत इतर साथीदारांना बोलावून घेतले. आरोपींनी फिर्यादीला गळा दाबून बेदम मारहाण केली.

तडीपार गुंडाला पिस्तुलासह अटक
पिंपरी : तडीपार असतानाही हद्दीत आलेल्या गुंडाला पिस्तुलासह चिखली पोलिसांनी अटक केली. ही कारवाई चिखली येथे करण्यात आली. रोहित उर्फ बाबू प्रकाश हिरे (रा. पाटीलनगर, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या आरोपीला दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. तरीही तो हद्दीत आला. त्याच्याकडून तीस हजार रुपये किमतीचे पिस्तूल जप्त केले.

मित्राला मारहाण केल्यावरून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न
पिंपरी : मित्राला मारहाण का केली? असे म्हणत एकाला मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना पिंपरीतील नेहरूनगर येथे घडली. या प्रकरणी शुभम उर्फ गोट्या हरी साबळे (रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रोहित उर्फ भुऱ्या सिद्धार्थ कांबळे (रा. पिंपरी) याला अटक केली असून एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे त्यांच्या वडिलांसह नेहरूनगर येथे गेले असता आरोपी त्यांच्याजवळ आले. त्यांच्या मित्राला चापट का मारल्या? या कारणावरून फिर्यादीवर हत्याराने मारहाण केली. तसेच दुचाकीचे नुकसान केले.

पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : बेकायदारित्या पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला पोलिसांच्या गुंड विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई निगडीतील भक्ती-शक्ती चौकाजवळ करण्यात आली. स्वप्निल सुहास हजारे (रा. त्रिवेणीनगर, तळवडे) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल व एक काडतूस जप्त केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर 'नंदा देवी' मोठ्या दिमाखात भारतात दाखल! तुमच्या घरातला गॅसचा प्रश्न सुटला...

पत्नी देवीशाचा एक प्रश्न अन् सूर्यकुमार यादवच्या कारकीर्दिला मिळाली कलाटणी; T20 World Cup विजेत्या कर्णधाराने अखेर सिक्रेट सांगितले

Gold Investment: युद्ध सुरू असतानाही सोन्याचे भाव का पडले? शेअर बाजार कोसळला तरी सोनं स्वस्त का? पुढे काय होणार? तज्ज्ञांचे मत

माणूस २०० वर्षे जगणार? शास्त्रज्ञांना सापडली १०० पट वेगाने DNA दुरुस्त करणारी 'मास्टर की'! काय आहे व्हेलचं कनेक्शन?

Latest Marathi News Live Update : पिंपरी चिंचवडमधील मुळा नदीच्या पात्रात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT