पिंपरी-चिंचवड

मोरवाडीतील वीजपुरवठा वारंवार खंडित

CD

पिंपरी, ता.२७ : ‘महावितरण’च्या कारभाराचा फटका मोरवाडीकरांना बसत आहे. श्रद्धा हेरिटेज परिसरातील सोसायटीधारकांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने स्थानिकांची घरगुती उपकरणे जळाल्याचा प्रकार समोर आला आहे. नागरिकांनी ‘महावितरण’च्या कार्यालयातही तक्रार केली आहे. याबाबत महावितरणने बिघाड किंवा दुरुस्तीच्या कामांमुळे वीज पुरवठा खंडित होत असल्याचे सांगितले आहे.


मोरवाडी परिसरात रेणुका गुलमोहोर फेज-१ आणि रेणुका गुलमोहोर फेज-२ व श्रद्धा हेरिटेज या तीन गृहसंकुलात मिळून अंदाजे ५०० सदनिका आहेत. या परिसरात सध्या महावितरणकडून दुरुस्तीची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी महापालिकेची खोदकामे सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून मोरवाडी विविध भागांत वीजपुरवठा विस्कळित होत आहे. रात्री-अपरात्री अचानक वीज खंडित होणे, दिवसा केव्हाही सलग दोन ते चार तास वीज जाणे असे प्रकार सुरू आहेत. वीज नसल्यामुळे पाणी टाकीपर्यंत पोहोचवता येत नाही. परिणामी, नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. पिण्याचे पाणी मिळत नाही, तसेच लहान-मोठे व्यवसाय बंद पडल्याने रहिवासी वैतागले आहेत. मोठ्या इमारती व कार्यालयामध्ये नागरिकांना लिफ्टसाठी जनरेटर सुरू करावे लागतात. सलग अनेक तास वीज खंडित असल्याने त्रस्त आहेत.


सकाळी कामाच्या वेळीच वीज जाते. टाकीत पाणी चढवण्यासाठी मोटार सुरू करावी लागते. तक्रार करुनही महावितरण प्रशासनाकडून उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे गैरसोय होते. वीज पुरवठ्यामुळे स्थानिकांची घरगुती उपकरणे मिक्सर, टीव्ही, पंखे बल्ब, ट्युबलाइट्स, गिझर, स्विचबोर्ड जळाली आहेत.
- पल्लवी हांडे, मोरवाडी

गेल्या काही महिन्यांपासून मोरवाडीतील सोसायट्यांमध्ये सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून वीज नसल्यामुळे नागरिकांची अनेक कामांचा खोळंबा होत आहे. विशेषत: घरातील पाणीपुरवठ्यावर विजेचा परिणाम होत आहे.
-किरण खैरे, मोरवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar Accident: पोलिसांना घाबरून पळाले अन् ट्रॅकवर गेले, समोरून आलेल्या मालगाडीनं उडवलं; तिघांचा मृत्यू

नवीन कर्णधार? वैभव सूर्यवंशीची संघात एन्ट्री! LA Olympics अन् ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२८ साठी कसा असेल भारताचा संघ? बरेच पर्याय उपलब्ध

Naman Awards 2026: स्मृती मानधना सलग ५ व्यांदा ठरली सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू; BCCI ने जाहीर केली पुरस्कारांची यादी

हम साथ साथ है फेम अभिनेत्रीचा सख्ख्या बहिणीनेच केला विश्वासघात ! नवरा तर पळवलाच पण संपत्तीही हडपली

सोनम वांगचुक यांची सुटका होणार, गृहमंत्रालयाकडून आदेश जारी; 'रासुका'वरही केंद्राचा युटर्न

SCROLL FOR NEXT