पिंपरी, ता. २८ ः भारतीय सिंधू सभा पिंपरी शाखेच्या वतीने पिंपरी येथील आवारात साधू टी. एल. वासवानी यांच्या १४६व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली.
येथील सामाजिक कार्यकर्ते मनोहर जेठवानी म्हणाले, ‘‘सामाजिक समरसता, बंधुता आणि इतर समाज बांधवांशी सामाजिक सलोखा असला पाहिजे असा मंत्र साधू टी. एल. वासवानी यांनी समाजाला दिला आहे.’’
‘‘२५ नोव्हेंबर हा दिवस सिंधी समाजातील बांधव शाकाहारी दिवस म्हणून साजरा करतात,’’ असे पुष्पा पमनानी यांनी सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मनोहर जेठवानी, श्रीचंद नागरानी, सुरेश हेमनानी, परमानंद जमतानी, हंशींराम हरजानी, सुशिल बजाज आदी उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सिंधी समाजातील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी सिंधी समाज बांधवांसाठी सिंधी भाषेतील कर्ज या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.