पिंपरी-चिंचवड

कासारवाडीत तरुणावर कोयत्याने हल्ला

CD

पिंपरी, ता. २८ : किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. ही घटना कासारवाडी येथे घडली.
संकेत सचिन भोसले (रा. बाराथे वस्ती, बोपोडी) असे या हल्‍ल्‍यात जखमी झालेल्‍याचे नाव आहे. त्‍यांनी दापोडी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात विक्रम देवकुळे, गणेश बावधाने उर्फ काचडी गण्या, नीलेश शिवगण (सर्व रा. पडाळवस्ती, भाऊ पाटील रोड, औंध रोड, बोपोडी) यांच्यावर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. संकेत यांना आरोपींनी नाशिकफाटा मेट्रो स्थानकाजवळ थांबवले. ‘‘आमच्याकडे का बघतोस,’’ असे म्हणत शिवीगाळ केली. विक्रम आणि गणेश यांनी कोयत्याने संकेत यांच्यावर वार केला. मात्र, फिर्यादीने तो अडविला. तितक्यात नीलेश याने सिमेंट गट्टूने मारहाण केली. मदतीसाठी आलेल्या नागरिकांनाही आरोपींनी धमकी देत हुसकावून लावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMart मध्ये खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! हे नियम माहिती नसतील तर नुकसान होऊ शकते, खरेदीपूर्वी नक्की वाचा!

Kolhapur Police Recruitment : कोल्हापुरात पोलिस भरतीसाठी लेखी परीक्षा उद्या; ८८ पदांसाठी ११३५ उमेदवार मैदानात

Latest Marathi News Live Update : परळीच्या धारावती तांड्यावर 16 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना

Multibagger Stock: ₹11 चा शेअर थेट ₹1100 वर! 1 लाखाचे झाले तब्बल 1 कोटी 10 लाख; 5 वर्षांत गुंतवणूकदार मालामाल

Kolhapur Water Project : ‘धामणी’चे अतिरिक्त पाणी करवीर तालुक्याला द्यावे; तर, कोल्हापूरला पोलिस आयुक्तालय हवे - नरके

SCROLL FOR NEXT