ड्रेनेजलाइन फुटल्याने सांडपाणी नदीत
चिंचवडच्या केशवनगर परिसरात गणपती समोरील पुलाखालील सांडपाणी वाहिनी फुटली आहे. त्यामुळे हे सांडपाणी नदीतील पाण्यात जात आहे. परिणामी हा परिसर दुर्गंधीयुक्त झाला असून सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने ही पाइपलाइन त्वरित दुरुस्त करावी. तसेच नदीत जाणारे सांडपाणी तातडीने रोखावे.
- रमेश देव, केशवनगर, चिंचवड
PNE25V71941
डीपीचा दरवाजा तुटलेल्या अवस्थेत
पिंपळे निलख येथील लक्ष्मीबाई धाईजे शाळेपासून १०० मीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला एक महावितरणाच्या डीपीचा दरवाजा निघाला आहे. त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो आहे, प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित दुरुस्ती करावी.
- मुदस्सर खान, पिंपळे निलख
PNE25V71944
भटक्या श्वानांचा सुळसुळाट
रहाटणी येथे भटक्या श्वानांचा सुळसुळाट वाढला आहे, मागील काही दिवसांपूर्वी अशाच एका श्वानाने माझा चावा घेतला. महापालिकेने या श्वानांचा योग्य बंदोबस्त करावा. जिजामाता हॉस्पिटल येथे चौकशी केल्यावर समजले, येथे रोज वीस लोकांच्या तक्रारी येतात. तरी याचा विचार आयुक्तांनी करून पुढील उपाययोजना करावी.
- शरद पाचनकर, रहाटणी
NE25V71945
चेंबरची दुरुस्ती करावी
पिंपळे सौदागर मधील लिनीयर गार्डन परिसरातील डॉग हाऊस जवळ चेंबरचे झाकण मागील १५ ते २० दिवसापासून जीर्ण झाले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तरी प्रशासनाने याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे.
- अशोक वारकर, पिंपळे सौदागर
PNE25V71943
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.