मारहाण प्रकरणी दोघांना अटक
पिंपरी : पिंपरीत एकाला रॉडने मारहाण केल्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
या प्रकरणी गणेश रामू शिरदाणे (रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनंत शशिराव कांबळे (रा. काळेवाडी) व शशिकांत दत्तात्रेय गोडबोले (रा. पाचपीर चौक, काळेवाडी) यांना अटक केली. फिर्यादी व आरोपी दारूच्या दुकानात कामाला आहे. फिर्यादी हे काउंटरवर असताना त्यांना काउंटरमधील पैसे का चोरले असे म्हणून आरोपींनी रॉडने मारहाण केली.
कोयता बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : कोयता बाळगल्याप्रकरणी एकाला वाकड पोलिसांनी काळाखडक येथे अटक केली.
शुभम धर्मा कांबळे (रा. काळाखडक, वाकड) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून एक कोयता जप्त केला आहे.
जुगार प्रकरणी सहा जणांवर गुन्हा
पिंपरी : जुगार सुरु असलेल्या ठिकाणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिटच्या पथकाने छापा टाकला. ही कारवाई शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लोढा सोसायटी येथे करण्यात आली.
अरुण खरोसे, संजयकुमार गुत्तेदार, संदीप वडमारे, सुरेश माळी, अमन सेनानी, चित्रसेन घरवाढवे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी येथून ७९ हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पिस्तूल जप्त; एकाला अटक
पिंपरी : बेकायदारीत्या पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या गुंड विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई चऱ्होली खुर्द येथे इंद्रायणी नदीकाठी करण्यात आली.
सार्थक बाळासाहेब डिले (रा. चिंतामणी कॉलनी, कोलवडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे आव आहे. या आरोपीकडून ५१ हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल व एक काडतूस जप्त करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.