पिंपरी, ता. २९ : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत आगामी काळात तीन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. पाठोपाठ या निवडणूक होत असल्याने पोलिसांवर मोठा ताण आहे. मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, गोंधळ होऊ नये आणि नागरिकांनी भयमुक्त वातावरणात मतदान करावे, सर्वत्र शांततेत निवडणुका पार पडाव्यात, यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.
दरम्यान, निवडणूका होत असताना यात्रा, सण, उत्सव, व्हीआयपी दौरे हे कार्यक्रम देखील पाठोपाठ होत आहेत. अशा स्थितीत कायदा - सुव्यवस्था कायम राखताना पोलिसांना कसरत करावी लागणार असल्याचे दिसून येते.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत शहर व ग्रामीण भागाचा समावेश आहे. तळेगाव दाभाडे, चाकण, आळंदी या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक दोन डिसेंबरला होत आहे. यासह पिंपरी-चिंचवड महापालिका व ग्रामीण हद्दीतील जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूकही आगामी काळात होत आहे. यामुळे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत पाठोपाठ तीन निवडणुका होत आहेत.
या निवडणुका शांततेत, निर्भय मुक्त व पारदर्शकपणे पार पडण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाया करण्यावर भर दिला आहे. सराईत गुन्हेगार, फरार घोषित केलेले गुन्हेगार, जामिनावर सुटका केलेले अथवा पॅरोलवर असलेले व यापूर्वी मागील दहा वर्षात निवडणुकीदरम्यान दाखल गुन्ह्यातील आरोपी यांची यादी तयार केली असून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. चांगल्या वर्तणुकीसाठी बंधपत्र लिहून घेणे, तडीपार करणे या कारवायाही सुरू आहेत.
इतर उपाययोजना
- निवडणुका जाहीर झाल्यापासून शस्त्रात्रे बाळगण्यास बंदी घातली असून परवाना धारक शस्त्रे जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे.
- बेकायदेशीर शस्त्रे, दारू बाळगणाऱ्याविरुध्द विशेष मोहीम राबविली जात आहे.
- आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून व्हिडिओग्राफी सर्वेलन्स पथक, भरारी पथक तसेच तपासणी नाक्यासाठीही अंमलदारांची नेमणूक केली आहे.
- संवेदनशील केंद्रावर बारीक लक्ष
गस्त वाढवली
निवडणुकीच्या काळात रात्रीची गस्त, महत्त्वाच्या चौकांत नाकाबंदी, वाहन तपासणी यावर विशेष भर देण्यात आला आहे. संवेदनशील केंद्राच्या ठिकाणी पोलिसांनी बारीक लक्ष ठेवले असून, अतिरिक्त बंदोबस्त ठेवला आहे.
----------------
निवडणुकीच्या दृष्टीने सर्व नियोजन करण्यात आले आहे. निवडणुका शांततेत पार पडण्यासह कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी वेळोवेळी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. प्रतिबंधात्मक कारवाईवर भर दिला आहे. मतदान केंद्रांची पाहणी करण्यासह रूट मार्च तसेच इतर उपाययोजना राबविल्या आहेत. बाहेरून अतिरिक्त बंदोबस्तही मागविला आहे.
- डॉ. शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.