पिंपरी-चिंचवड

जुन्या-नव्यांना सोबत घेतल्याने पक्षात उत्साह

CD

पिंपरी, ता. ५ : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महाविकास आघाडीतील घटक पक्षांसमवेत पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक लढविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार शहरातील जुन्या-नव्या १७ पदाधिकाऱ्यांची कोअर कमिटी स्थापन केली आहे. निवडणुकीबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना आहेत.
निवडणुका आल्या की नाराजीनाट्य, मानपान, गटतट, रुसवे-फुगवे दिसून येतात. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये हे टाळण्यासाठी आणि कार्यकर्त्यांनी संघटितपणे काम करावे, पक्षाची ताकद वाढवण्याचे काम व्हावे यासाठी पक्षाने निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच सावध भूमिका घेतली आहे. शहरातील पदाधिकाऱ्यांची २३ सप्टेंबर रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पिंपरीत बैठक घेतली होती. तसेच काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची भेट घेतली. या दोन्हीही वेळी महापालिका निवडणूक लक्षात घेऊन पक्षात कोणतेही बदल न करण्याचा निर्णय वरिष्ठांकडून घेण्यात आला. मात्र, निवडणुकीसंदर्भात शहर पातळीवरील निर्णय घेण्यासाठी कोअर कमिटी नियुक्त केली. यामध्ये खासदार डॉ. अमोल कोल्हे, प्रभारी हर्षवर्धन पाटील, आमदार रोहित पवार यांच्यासह शहराध्यक्ष, कार्यध्यक्ष, शहर संघटक, माजी महापौर, नगरसेवक, पदाधिकारी, विविध आघाड्यांचे अध्यक्ष यांचा समावेश आहे.
या पदाधिकाऱ्यांवर निवडणुकीतील जबाबदारी, महत्त्वाचे निर्णय, प्रचार, पक्षाची रणनीती सर्व काही ठरविण्याची जबाबदारी दिलेली आहे. निवडणुकीतील यश-अपयश या दोन्हीची जबाबदारी कमिटीतील सदस्यांवर राहील अशा सूचनाही वरिष्ठांनी दिल्या आहेत. कोणालाही नाराज न करता सर्वांना एकत्र घेऊन जाण्याच्या नवीन धोरणामुळे ऐन निवडणुकांमध्ये होणारी नाराजी टाळून पदाधिकारी व कार्यकर्ते यांना एकत्र काम करण्याची ऊर्जा मिळेल, अशी अपेक्षा पक्षातून व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Trends 2025 : भारतीयांनी २०२५ मध्ये कोणत्या क्रिकेटपटूला Google वर जास्त सर्च केलं? रोहित, विराट Top 10 मध्येही नाही...

Marathi Breaking News LIVE: आठवडाभरात दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार न केल्यास पालिका निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयात मतदार यादींची होळी करणार - संदेश देसाई

Sangli Crime : ट्रकमधून पाच लाखांचे शस्त्रक्रिया साहित्य गायब; पोलिसांच्या चतुर कारवाईत तीन महिलांची कबुली, मोठा गुन्हा उघड

Manchar News : मंचर बाजार समितीतर्फे प्रति क्विंटल ५,३५८ रुपये शासकीय हमी बाजारभावाने सोयाबीन खरेदीला सुरुवात; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Mumbai Local: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलकडून १३ प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री स्थगित, कारण काय?

SCROLL FOR NEXT