पिंपरी-चिंचवड

दुरुस्तीला ब्रेक, खड्ड्यांना गती!

CD

पिंपरी, ता. २ ः शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीची कामे ठप्प झाल्याने पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे निर्माण होत आहेत, आणि वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. योग्य दर्जाचे डांबर किंवा आवश्यक साहित्य वापरून खड्डे दुरुस्त न केल्यामुळे ही समस्या कायम भेडसावत आहे. रस्ते दुरुस्तीसाठी पिंपरी चिंचवड महापालिका स्थापत्य विभागांतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करते, तरी खड्डे कायमस्वरूपी का बुजवले जात नाहीत? असा प्रश्न वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेकडून रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. पावसाळ्यात खड्ड्यांचे प्रमाण वाढते. मात्र, पाऊस थांबून दोन महिने उलटूनही खड्डे दुरुस्तीची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. पावसाळ्यात तात्पुरत्या स्वरूपात केलेली डागडुजी पावसाबरोबरच निघून गेली आहे. पावसाळ्यानंतरही दुरुस्ती न झाल्याने तेच खड्डे पुन्हा मोठ्या आकारात दिसत असून, वाहतुकीस अडथळे ठरत आहेत. पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी दरम्यान दोन्ही बाजूंना ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी तर रस्त्यावरील डांबर पूर्णपणे निघाल्याने वाहनचालकांचे हाल होत आहेत.
निगडी ते चिंचवड मेट्रो विस्तारकामासाठी उभारलेल्या बॅरिकेड्‍समुळे सेवा रस्ता अरुंद झाला असून, जड वाहतुकीमुळे येथे मोठे खड्डे पडले आहेत. चिंचवड येथील संत मदर तेरेसा उड्डाणपुलानंतर स्टेशनकडे जाताना रस्त्यावरील डांबर खरडून निघाले आहे. वाहनचालकांचा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता आहे. पिंपरी ग्रेड सेपरेटर भागात, महापालिका भवनासमोरही रस्त्यावरील डांबर निघाल्यामुळे वेगाने जाणाऱ्या वाहनांना अचानक ब्रेक लावून तोल सांभाळावा लागत आहे. औंध-रावेत बीआरटी मार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांची समस्या तीव्र झाली आहे. रक्षक सोसायटी चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या सर्व भागांमध्ये वाढत्या खड्ड्यांमुळे व रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघाताचा धोका वाढला असून, नागरिकांनी महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या प्रमुख रस्त्यांवर खड्डे आणि ओरखाडे
- किवळे-मुकाई चौक ते रावेत-भोंडवे कॉर्नर : बीआरटी मार्गावरील रस्त्याचे डांबर उखडले असून ठिकठिकाणी खोल खड्डे पडले आहेत.
- निगडी-भक्ती शक्ती चौक ते इंद्रायणीनगर-भोसरी : स्पाईन रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. स्पाईन सिटी येथे रस्त्यावर ओरखाडे मारले आहेत.
- देहू-आळंदी रस्ता : रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे आणि धुळीचे प्रचंड प्रमाण असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
- काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता : केएसबी चौक उड्डाणपुलाजवळ रस्त्यावर खोल ओरखडे तयार झाले आहेत.
- चिंचवड स्टेशन ते केएसबी चौक : दुरुस्त केलेले खड्डे पुन्हा उघडे पडल्याने रस्ता धोकादायक झाला आहे.

‘‘वाकड ते आळंदी मार्गावर केएसबी चौकातल्या ओरखाड्यांमुळे दुचाकी घसरली होती, कसाबसा तोल सावरला. पुढे टेल्को गेटसमोरही खड्डे चुकवतच गाडी चालवावी लागली. डुडुळगावातही रस्त्यांची अवस्था खराब असून अपघाताची शक्यता कायम जाणवत होती.
- अनंत मोरे, वाहनचालक

‘‘पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी-कासारवाडी परिसरात रस्ता खचलेला आणि भेगा पडलेल्या ठिकाणी दुचाकी सावधपणे चालवावी लागली. संत तेरेसा पुलाजवळही रस्ता उखडलेला असल्याने वेग कमी करावा लागला. महापालिका इतका निधी खर्च करते, तरी हे खड्डे पुन्हा का तयार होतात?
- सुशांत ढोणे, वाहनचालक

‘‘शहरात पाइपलाइन, विद्युत आणि अन्य सेवा वाहिन्यांची कामे सुरू असल्याने काही ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती कामे पुढे ढकलण्यात
आली आहेत. सेवा वाहिन्यांची कामे पूर्ण होताच खड्डे दुरुस्तीला वेग दिला जाईल. काही रस्त्यांवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी डांबर काढून समांतरता आणण्याचे कामही केले जात असून, ते लवकरच दुरुस्त केले जाईल.
- बापूसाहेब गायकवाड, सहशहर अभियंता, स्थापत्य विभाग
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NHAI-Jio safety alert system: ‘हायवे’वरील धोक्यांचा इशारा आता मोबाइलवर आधीच कळणार ; 'NHAI-Jio' मध्ये करार!

मैदानी चाचणी फेब्रुवारीपासून! पोलिस भरतीत एका पदासाठी ८३ उमेदवार; इच्छुकांना रविवारपर्यंत करता येईल अर्ज; १५,६३१ पदांची भरती

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारचं मोठं विधान; कर्मचाऱ्यांची 'ही' मागणी फेटाळून लावली

Pune Voter List : मतदार यादीवर हरकत नोंदविण्यासाठी आज शेवटचा दिवस; हरकतींची संख्या १२ हजाराच्या वर!

Ahilyanagar Leopard Attack : बिबट्याच्या अचानक हल्ल्याने भागूबाई खोडदे यांचा बळी; पारनेर तालुक्यात भीतीचं वातावरण!

SCROLL FOR NEXT