पिंपरी-चिंचवड

पॉइंटर्स

CD

अपघात रोखण्यासाठी नोव्हेंबरमधील घडामोडी
१) हिंजवडी आयटी पार्क हद्दीत अवजड वाहनांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी वाहन मालकालाच जबाबदार धरण्याचा इशारा हिंजवडी पोलिसांनी वाहनचालक मालकांना बैठकीत दिला
२) सकाळी ७.३० ते ११.३० आणि सायंकाळी ५.३० ते रात्री ९.३० या वेळेत अवजड वाहनांना प्रवेशबंदी; वेग मर्यादा, ब्रेक, टायर, लाइट, टायर प्रेशर यांची रोज तपासणी, नियमभंग केल्यास वाहन जप्ती व परवाना रद्दचा इशारा ३) वाहन चालवताना मोबाईल वापरणे पूर्णपणे बंद, चालकाने मद्यपान किंवा कोणतीही नशा केली नसल्याची खात्री मालकाने स्वतः करावी, प्रत्येक वाहनामध्ये डॅशकॅम व केबिन कॅमेरा अनिवार्य, अशा वाहन चालकांना सूचना
४) जड-अवजड वाहनांच्या वेगावर मर्यादा, वाहतूक नियमांविषयी जागरूकता आणि चालकांसाठी प्रशिक्षण शिबिरे घेण्याचे २४ नोव्हेंबरच्या बैठकीत ठरले. नियम भंग करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाईचा पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांचा इशारा
५) नाकाबंदीच्या ठिकाणी वाहनचालकांची ‘ब्रेथ ॲनलायझर’द्वारे तपासणी करून जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत तीन हजार २३८ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई

अपघाताची कारणे
- वाहनचालकांचे अपूर्ण प्रशिक्षण
- वेगमर्यादा न पाळणे
- दृश्यमानता कमी असणे
- रस्त्यांवरील बेफिकीर पद्धत
- वाहनांची योग्य देखभाल न करणे
- रस्ते सुरक्षेबाबत अनास्था

गेल्या आठवड्यातील सामूहिक बैठकीत जबाबदारीचे वाटप
- वाहतूक विभाग - अवजड वाहनांचे अपघात होणाऱ्या ठिकाणांबाबत (ब्लाइंड स्पॉट) दुचाकी चालकांमध्ये जनजागृती करणे
- पीएमआरडीए व वाहतूक विभाग - विनापरवाना आरएमसी प्रकल्पावर निष्कासनाची कारवाई करणे
- पीएमआरडीए - बांधकाम प्रकल्पामध्येच आरएमसी प्लांट उभारण्यासाठी प्रोत्साहन देणे
- आरटीओ व वाहतूक विभाग - पिंपरी चिंचवड शहरात अवजड वाहनांचा वेग प्रतितास किलोमीटर मर्यादित ठेवणे
- वाहतूक विभाग - अवजड वाहनांचे अपघात झाल्याच्या ठिकाणांचा नकाशा तयार करणे व पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे
- आरटीओ, वाहतूक विभाग - अवजड वाहनांची फिटनेस तपासणी करणे, ओव्हरलोड वाहनांना दंड करणे
- वाहतूक विभाग - विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनावर कारवाई करणे
- आरटीओ - अवजड वाहनांच्या मालकांची बैठक घेऊन सुरक्षिततेच्या सूचना देणे

जानेवारी ते ऑक्टोबरपर्यंतचे गंभीर अपघात
२४ जानेवारी ः माण येथे सिमेंट मिक्सर ट्रक उलटल्याने दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा चिरडून मृत्यू
२ जुलै ः ताथवडे येथे डंपरने दुचाकीला मागून धडक दिल्याने ३७ वर्षीय महिला गंभीर जखमी
२९ जुलै ः पुनावळेतील काटे वस्तीत डंपरची धडक बसून ३३ वर्षीय दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू
१२ ऑगस्ट ः हिंजवडी फेज २ येथे ११ वर्षीय मुलीचा डंपरखाली चिरडून मृत्यू
१० ऑक्टोबर ः हिंजवडी-माण रस्त्यावर पांडवनगर चौकात सिमेंट मिक्सर ट्रकखाली चिरडून ३४ वर्षीय महिलेचा मृत्यू

मद्यपी चालकांमुळे धोके
- वाहनावर नियंत्रण राहत नाही
- वाहन अतिवेगात तसेच वेडेवाकडे चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जाते
- स्वतःच्या तसेच इतरांच्याही जिवाचा विचार केला जात नाही
- रस्त्यावर वादाचे आणि त्यातून मारामारीचे प्रकार
- प्राणघातक अपघाताची शक्यता वाढते

‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची कारवाई
(पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय क्षेत्र)
महिना / कारवाई
जानेवारी / ३४६

फेब्रुवारी / ३५६
मार्च / ६८८
एप्रिल / २८९
मे / १७५
जून / १७०
जुलै / ३३२
ऑगस्ट / ३०८
सप्टेंबर / ३२०
ऑक्टोबर / २५४
एकूण / ३२३८
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: युद्धामुळे अडकलेले कोल्हापूरकर परतले, दुबई प्रशासनाने प्रत्येकाला दिलं २६ हजाराचं गिफ्ट

Latest Marathi News Live Update : पुण्यातील सिंहगड–भोर परिसरात आगीमुळे सुमारे ४० हेक्टर क्षेत्र जळून खाक झाल्याची माहिती वनविभागाने दिली

Gold Price Increase India : सोने -चांदी दरावर युद्धाचा थेट परिणाम, दर वाढीचा फटका

Sanju Samson Video:'तुझं पदार्पण कधी झालंय...', अक्षर पटेलने हा प्रश्न विचारताच कशी होती सॅमसनची रिअॅक्शन?

‘माझ्या मुलाला मायदेशी आणा’, विशाखा सुभेदार यांचा मुलगा कुवैतमध्ये अडकला, अभिनेत्रीची सरकारकडे मदतीची आर्त हाक

SCROLL FOR NEXT