पिंपरी, ता. १ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (पीएमआरडीए) शिवभोजन केंद्र अनुदानापासून वंचित आहे. गेल्या सात महिन्यांपासून तोटा सहन करत शिवभोजन थाळ्या पुरवीत असल्याचे केंद्रचालकांचे म्हणणे आहे. यानंतर मात्र अनुदान मिळाले नाही तर बंद करावे लागेल, असेही त्यांनी नमूद केले. या निधीचे विहित कालावधीत वाटप न झाल्यामुळे केंद्रचालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. काही केंद्रे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. शासन निर्णयानुसार दर १५ दिवसांनी अनुदान मिळणे अपेक्षित असूनही एप्रिलपासून आजपर्यंत निधी आलेला नाही. दिवाळीपूर्वी अनुदान वाटप होईल, अशी घोषणा शासनाकडून करण्यात आली होती; आतापर्यंत फक्त मार्च महिन्याचे आणि काही केंद्रचालकांचे एप्रिल महिन्याचे अनुदान दिवाळीत वितरित झाले आहे. बाकीच्या महिन्यांचे अनुदान न मिळाल्यामुळे शिवभोजन केंद्र चालवणारे आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे त्यांना गोरगरीबांसाठीची शिवभोजन थाळी सुरू ठेवणे कठीण झाले आहे. या कार्यालयामार्फत ५० पेक्षा जास्त थाळ्यांचा पुरवठा होत आहे.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.