पिंपरी-चिंचवड

वाहतूक कोंडी, वेगमर्यादांचे उल्लंघन आणि अकार्यक्षम नियोजनामुळे अपघात

CD

भरधाव वाहतुकीकडे प्रशासनाची डोळेझाक

वाहतूक कोंडी, वेगमर्यादांचे उल्लंघन आणि अकार्यक्षम नियोजनामुळे अपघात

पिंपरी, ता. १ ः वाकड गावठाण चौकातून हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या वाहनांचा वेग अक्षरशः नियंत्रणाबाहेर असतो. भुजबळ चौकातील उड्डाणपुलावरून हिंजवडीला जाणारा स्वतंत्र रस्ता उपलब्ध असतानाही वेगमर्यादांचे सर्रास उल्लंघन केले जाते. पुढे हिंजवडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध उपरस्ते एकत्र आल्याने मोठी वाहतूक कोंडी होते. उड्डाणपुलाच्या उतारावरून वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता वाढते. विशेषतः कंपन्यांतील कर्मचारी, कामगारांची वाहतूक करणाऱ्या बसही मर्यादेपेक्षा जास्त वेगाने धावत असतात. अशा वेळी वाहतूक नियंत्रणासाठी कार्यरत पोलिस काय करतात?, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.
हिंजवडी आयटी पार्कमधील बहुराष्ट्रीय कंपन्यांत कामावर पोहोचण्यासाठी सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात आयटी कर्मचाऱ्यांची वर्दळ असते. खासगी वाहने, कंपन्यांच्या प्रवासी बस तसेच दुचाकी-चारचाकींमधून कर्मचारी घाईघाईने हिंजवडीच्या दिशेने रवाना होतात. पिंपळे सौदागर, वाकड, विशालनगर परिसरात राहणारे आयटी कर्मचारी वाकड गावठाण चौकातून भुजबळ चौक उड्डाणपुलावरूनच हिंजवडीमध्ये प्रवेश करतात. सायंकाळी कार्यालयातून घरी जातानाही हीच गर्दी आणि घाई दिसून येते. या मार्गावर सतत वाढणाऱ्या वाहतूक कोंडीचा विचार करून महापालिकेने वाकडमधील बीआरटी मार्गावरील एका बाजूचे बॅरिकेड्स हटवून रस्ता मोकळा केला आहे. तरीही वाहनचालक वेगमर्यादा न पाळता मोठ्या वेगानेच हिंजवडी आयटी पार्कच्या दिशेने धावतात. भुजबळ चौक उड्डाणपुलावरून छत्रपती शिवाजी चौकात येताना अनेक वाहनांचा वेग नियंत्रणाबाहेर जात असून, नियंत्रण सुटल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे.

प्रशासनाच्या निष्क्रियतेचे बळी
हिंजवडी येथील छत्रपती शिवाजी चौकातील भरधाव वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यात वाहतूक पोलिसांना, बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करण्यात आरटीओला तसेच रस्ता नियोजनात हिंजवडी ग्रामपंचायतीला आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) अपयश आले आहे. यामुळेच सोमवारी झालेल्या भीषण अपघातात निष्पाप भावंडांना जीव गमवावे लागणे, अत्यंत दुःखद आणि चिंताजनक आहे.

कंपन्या-प्रशासनाची डोळेझाक
हिंजवडीतील कामगार वाहतूक बस वाहतूक पोलिस व आरटीओचे नियंत्रण दिसत नाही. फक्त बेदरकार वाहनचालकांच्या तक्रारींसाठी दिलेला क्रमांक हा औपचारिकतेपुरता असून, चालक मात्र मालकांच्या पाठिंब्यावर दादागिरी करतात. कंपन्यांचे सुरक्षा सप्ताह उपक्रम केवळ दिखावा ठरतो. अनेक आयटी कंपन्यांकडून बसचालकांची तपासणी होत नाही, असे दिसते. त्यामुळे बसचालकांकडून नियमभंग, बेफाम वेग आणि अरेरावी करण्याचे प्रकार वाढले आहेत. छोटे अपघात तडजोडीतून मिटविल्याने चालक निडर झालेले आहेत. मुंबईतील कालबाह्य एमएच ०३ आणि ०४ पासिंग बसही बिनधास्तपणे धावतात. बहुराष्ट्रीय कंपन्या व प्रशासन याकडे डोळेझाक करीत असल्याचे चित्र आहे.

बसचालकांची अरेरावी, तपासणीला विरोध
कामगार वाहतूक बसमध्ये प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही चालकांची अरेरावी सहन करावी लागते. तक्रार केल्यास ठराविक थांब्यावर न थांबता बस पुढे नेण्याची प्रवृत्ती वाढली आहे. अनेक बसमालक स्थानिक असल्याने कंपनी अधिकाऱ्यांवर त्यांचा दबाव असून, त्यामुळे बस व चालकांची तपासणी टाळली जाते. उलट्या दिशेने बस घुसवून वाहतूक अधिक बिघडविण्याचे प्रकार वाढले आहेत. शिवाय, देव-घेव होत असल्याने पोलिसही दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यामुळे केवळ कंपनी व्यवस्थापनालाच दोष देऊन पोलिस जबाबदारी टाळू शकत नाहीत, अशी नागरिकांची भावना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: ... तर महेंद्रसिंग धोनी CSK संघातील जागा अडवतोय! एबी डिव्हिलियर्स म्हणाला, निवड गुणवत्तेच्या आधारावर झाली पाहिजे

इराणच्या पेट्रोलपेक्षा भारतात चहा महाग! एक लीटर पेट्रोल अन् डिझेलचा दर वाचून बसेल धक्का

पठ्ठ्याने १६ iPhone तर चोरले पण एक चुकी पडली महागात, पोलिसांनी ट्रेनमधून घेतलं ताब्यात; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, अनिल बोंडे यांच्याकडून टीका

सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास! पण कुठे आणि कसा? परिवहनमंत्र्यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT