पिंपरी-चिंचवड

श्रीहरी कुलकर्णी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

CD

ओशो रजनीश - जो स्वतः हसतो, तो ईश्वराची प्रार्थना करत असतो आणि जो इतरांना हसवतो, त्यांच्यासाठी ईश्वर स्वतः प्रार्थना करतो.
अ) सु. ल. खुटवड
ब) परिचय
क) विसंगती शोधता आली पाहिजे
१) साजूक म्हशीचे तूप
२) भव्य महिलांचे कबड्डी सामने
३) वयाच्या मानानं तुमची तब्येत ठणठणीत आहे पण नजर मात्र वाईट आहे. त्यावर सिस्टरला सांगावं लागलं.
अगं बाई तुला जे म्हणायचं आहे, नजर नव्हे दृष्टी म्हणतात आणि वाईट नव्हे अधू किंवा कमकुवत म्हणतात.
४) ट्रकवर लिहिलेले असते. चिंटू, पिंटू, स्वराज, स्वराली आणि खाली लिहिलेले असते. बॅंक आॅफ महाराष्ट्राच्या सौजन्याने
५) वाहने सावकाश चालवा. कोणीतरी आपली वाट पाहत आहे. असा बोर्ड लिहलेला असतो. आता अशानं कोणी सावकाश चालवेल का? उलट त्याला उत्सुकता लागणार. कोणीतरी आपली वाट पाहत असेल म्हणजे त्याला शंका येणार, की कोण असेल शेजारीण तर नसेल की दुसरं कोण असेल, या उत्सुकतेपोटी तो अजून जोरात गाडी चालवणार. त्यापेक्षा
वाहने सावकाश चालवा, घरी बायको वाट पाहत आहे. असं लिहा. गाडीचा निम्मा वेग कमी होतो की नाही ते बघा. आणि त्यातही तुमची बायको वाट पाहतेय, असं म्हटलं तर वेग आणखी कमी होईल.

कौटुंबिक

१) सुखी व्हायचं असेल तर आतला आवाज ऐका. आतला आवाज म्हणजे स्वयंपाकघरातला.
२) सकाळी लवकर उठून घर स्वच्छ झाडावे. त्याने घरात समृद्धी येते. त्यानंतर अंघोळ करून देवपूजा करावी. त्यामुळे घरात पाॅझिटिव्ह एनर्जी येते. नंतर किचनमध्ये जावे व त्यानंतर नाश्त्याची तयारी करावी.
त्यामुळे घरातील लोकांचे स्वास्थ उत्तम राहते. हे सर्व झाल्यावर मस्तपैकी चहा बनवून बेडरूममध्ये जावे आणि बायकोला उठवून बेड टी द्यावा. त्यामुळे आयुष्य एकदम सुखी होते.
३) जी बाई नवऱ्याला घाबरते, तिला स्वर्ग नक्की भेटतो आणि जी घाबरत नाही, तिला इथंच स्वर्ग आहे.
४) ग्लास फुटल्यानंतरही घरात शांतता असेल तर तो ग्लास बायकोने फोडलेला असतो आणि चूक त्या ग्लासाचीच असते.
५) पुरूषांना दुःख याचं नाही, की बायको काम करुन घेते. वाईट याचं वाटतं, की काम झाल्यावर बायको म्हणते, ‘हा माणूस काही कामाचा नाही.
६) कारमध्ये बसल्यावर नवरा सीटबीट लावू लागल्यावर तुम्हाला ना माझ्या वटपौर्णिमेच्या व्रतावर थोडादेखील विश्वास नाही.

-----------------------

१) घरबसल्या पैसे दुप्पट करण्याची आयडिया सांगतो. पैसे आरशासमोर ठेवायचे.
२) चहा घेत असताना तुमच्या खासगी गोष्टी हळू आवाजात बोला. आमच्या कपाला कान आहेत.
३) माणसानं कुकरसारखं जगावं. वरून प्रेशर आणि खालून आग लागली असली तरी शिट्ट्या मारत जगावं.
४) हसणं हे शरीरासाठी खूप चांगलं आहे. पण नको तिथं हसल्यानं मारही खावा लागतो.
५) स्वतःला शहाणं समजणाऱ्यांचा मला खूप राग येतो. त्यामुळे मी आरशासमोर मी कधी उभा राहत नाही.
६) हसण्याने आयुष्य निरोगी होते आणि दुसऱ्यावर हसण्याने निरोपयोगी होते.
७) स्वतःचा वाईट विचार करू नका. कारण परमेश्वराने या कामासाठी हितशत्रूंची नेमणूक केली आहे. एक रूपयाही पगार न घेता आपल्या पाठीमागे नावं ठेवण्याचं काम ते उत्तम करीत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवाशांना दिलासा! ठाणे–मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक पूर्ण होणार; रेल्वेमंत्र्यांचे आश्वासन

U19 Asia Cup: पुन्हा भारत - पाकिस्तान फायनल! कधी आणि कुठे पाहाणार लाईव्ह सामना? जाणून घ्या एका क्लिकवर

Baba Bageshwar warning : ‘’.. तर या देशातील हिंदू १९९२ ची पुनरावृत्ती करण्यास तयार आहेत’’ ; बाबा बागेश्वर यांचा इशारा!

मुंबईतील चाळीत राहणाऱ्या तीन मित्रांची धमाल गोष्ट; 'गोट्या गँगस्टर'चा ट्रेलर लाँच, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Ambegaon News : बिबट्याच्या दहशतीने आंबेगाव तालुक्यातील धार्मिक-सामाजिक जीवन ठप्प; भाविकांमध्ये भीतीचे सावट!

SCROLL FOR NEXT