पिंपरी-चिंचवड

सकाळ संवाद

CD

सकाळ संवाद

चिखली- आकुर्डी रस्त्यावर
झाडामुळे अपघाताचा धोका
चिखली- आकुर्डी मुख्य रस्त्यावर साने चौकाच्या पुढील परिसरात रस्त्याच्या मध्यभागी एक झाड धोकादायक स्थितीत उभे आहे. हे झाड कमकुवत झालेले असून वाहतुकीला अडथळा ठरत आहे. यामुळे गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता आहे. संबंधित ठिकाणी तातडीने पाहणी करून या झाडाची स्थिती तपासावी. आवश्यक असल्यास झाडाची छाटणी, स्थलांतर किंवा अन्य उपाययोजना तत्काळ कराव्यात. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्यावर सुरक्षित वाहतूक व्यवस्था सुनिश्चित करावी.
-निर्गुण थोरे, चिखली
PNE25V73213


तुटलेल्या जाळीमुळे
अपघाताची शक्यता
सांगवी फाटा येथे सांगवीकडे जाणाऱ्या भुयारी मार्गातील पावसाचे पाणी निचरा होणाऱ्या वाहिनीवरील लोखंडी जाळी तुटल्याने अपघाताची दाट शक्यता आहे. तरी महापालिकेच्या संबंधित विभागाने तक्रारीचे निवारण करावे.
-सनी शिंदे, पिंपळे निलख.
PNE25V73212


दापोडी मेट्रो स्टेशनजवळ
पादचारी मार्ग हवा
दापोडी मेट्रो स्टेशनजवळ सध्या थेट पादचारी मार्ग उपलब्ध नाही. त्यामुळे, प्रवाशांना मेट्रो स्टेशनवर पोहोचण्यासाठी रस्त्याने प्रवास करावा लागतो. पादचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी येथे पादचारी मार्ग हवा.
-एक त्रस्त नागरिक, दापोडी
-PNE25V73211


रक्षक चौकातील बसथांब्यावर
बाकडे बसवावेत
रक्षक चौक येथे पीएमपीएमएलने प्रवाशांच्या सोयीसाठी बसथांबा उभारला. परंतु, प्रवाशांना बसण्यासाठी बाकडे बसवावेत हे त्यांच्या ध्यानात आले नाही किंवा त्यांनी दुर्लक्ष केले असावे. याठिकाणी पुण्याला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रवासी बसची वाट पाहत ताटकळत उभे असतात. ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान बालके यांचे अतोनात हाल होत आहेत.
-एक नागरिक, नवी सांगवी
PNE25V73210

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISRO मध्ये वैज्ञानिक असल्याचे सांगत लग्नाचं आमिष; पुण्यातील महिलेकडून ४२ लाख रुपये उकळले...

IND vs ENG, Semi: भारताने इंग्लंडविरुद्ध कोणती Playing XI खेळवावी? रवी शास्त्री, रिकी पाँटिंग यांचा सल्ला; म्हणाले, अभिषेकला तर...

विकी कौशल चिमुकलीच्या चक्क पडला पाया! स्टेजवरचा तो क्षण पाहून सगळेच झाले भावूक, Viral Video

Navi Mumbai: नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! १८.६३ कोटींचे अमली पदार्थ भस्मसात

भाजपची राज्यसभेची पहिली यादी जाहीर; राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन बिहारमधून उमेदवार, महाराष्ट्रातून कोण कोण?

SCROLL FOR NEXT