पिंपरी-चिंचवड

मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा शनिवारपासून

CD

पिंपरी, ता. ३ ः श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराजांचा ४६४ व्या संजीवन समाधी सोहळा येत्या शनिवारपासून (ता. ६) सुरू होत आहे. मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांच्याहस्ते उद्‍घाटन होईल.
नऊ डिसेंबरला प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ. प्रमोद चौधरी यांना ‘श्री मोरया गोसावी महाराज जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येईल. ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल. दहा डिसेंबरपर्यंत सोहळा चालेल. मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी बुधवारी (ता. ३) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी विश्वस्त जितेंद्र देव, केशव विद्वांस, ॲड. देवराज डहाळे आदी उपस्थित होते. पाचही दिवस सकाळी सहा वाजता सनई चौघडा वादन होईल. सकाळी ८.३० वाजता श्री मोरया गोसावी महाराज ओवीबद्ध चरित्र पठण होईल. या कालावधीत धार्मिक कार्यक्रमांबरोबरच समाजोपयोगी उपक्रमांनाही महत्त्व देण्यात आले आहे. त्यानुसार सात आणि आठ डिसेंबर रोजी आरोग्य, दंत व नेत्र तपासणी, तसेच रक्तदान शिबिरे होतील. उद्‍घाटनापूर्वी नितीन दैठणकर यांचे सनईवादन होईल. ५.२० वाजता उद्‍घाटन कार्यक्रम होईल. त्यानंतर योगिता गोडबोले आणि संदीप उबाळे यांच्या सुगम संगीताचा कार्यक्रम होईल.
सोहळ्याच्या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भक्तांनी सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मंदार महाराज देव यांनी केले.
इतर दिवसांचे कार्यक्रम ः
रविवार (ता .७)ः सकाळी ७ पासून सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, सामुदायिक महाभिषेक, वैदिक पद्धतीने मन्युसुक्त हवन, सायंकाळी ६ ः पवना नदी पूजन, प्रथमेश लघाटे-मुग्धा वैशंपायन यांचा ‘मर्मबंधनातली ठेव’ कार्यक्रम, योगेश सोमण यांचा ‘आनंदडोह’ कार्यक्रम
- सोमवार (ता. ८ ) ः ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांचे ‘सध्याचा सामर्थ्यशाली भारत’ या विषयावर व्याख्यान, भुवनेशकुमार कोमकली यांच्या उपशास्त्रीय गायनाने समारोप
- मंगळवार (ता. ९) ः सायंकाळी ६ - ‘श्री मोरया गोसावी महाराज जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान सोहळा, संकर्षण-स्पृहा यांचे विशेष सादरीकरण
- बुधवार (ता. १०) ः पहाटे ४.३० पासून मंदार महाराज देव व चिंचवड ब्रह्मवृंद यांच्या हस्ते श्रींच्या संजीवन समाधीची महापूजा, सकाळी ७ - पुष्पवृष्टी, नगारखाना आणि केरळी वाद्य पथकासह नगरप्रदक्षिणा, सकाळी ९.३० ते ११.३० - प्रमोद महाराज जगताप यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन, दुपारी १२ पासून - सर्व भक्तांसाठी महाप्रसाद, सायंकाळी - मानवंदना ढोलताशा पथक, गंगा आरती, रात्री ८ - भव्य आतषबाजीसह सोहळ्याची सांगता.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Nashik Railway : रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती: पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार; पहिल्या टप्प्यात ८,९७० कोटींचा खर्च

Excise Law: सिगारेटसह पान मसाल्याच्या किमती वाढणार! लोकसभेत मोठा निर्णय; हे विधेयक का आणले गेले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील सर्व शाळा उद्या बंद

Malegaon News : घरकुल लाभार्थ्यांचे सुमारे सहा कोटी रुपये थकले; प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान हिशोब विभागाच्या दिरंगाईमुळे रखडले

Viral Video: 'सनम तेरी कसम...' गाण्यावर डान्स करणाऱ्या नव वधु-वराचा व्हिडिओ तुफान व्हायरल, यूजर्सच्या मजेदार कमेंटचा पाऊस

SCROLL FOR NEXT