पिंपरी-चिंचवड

क्राइम

CD

ट्रकचालकाकडून गुटखा जप्त
पिंपरी ः शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची वाहतूक केल्याप्रकरणी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने नरेश गणेश चौधरी (वय २२, रा. भोसरी) या ट्रकचालकाला अटक केली. पोलिसांनी एकूण ३६ लाख ४७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश असल्याने मालमत्ता गुन्हे विरोधी पथक तपास करीत होते. त्यावेळी मुंबई-पुणे महामार्गावर एका ट्रकमधून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती त्यांना पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने बालेवाडी परिसरात ट्रकची तपासणी केली. ट्रकमध्ये ११ लाख ४७ हजार ९०० रुपये किमतीचा गुटखा आढळला. या साठ्यासह पोलिसांनी २५ लाख रुपये किमतीचा ट्रकही जप्त केला.
...
पानटपरी चालकावर वार
पिंपरी ः संत तुकारामनगर परिसरात एका पान टपरी चालकावर दोघांनी कोयत्याने वार केला. याप्रकरणी दरबान मोहन सिंग (वय ३५, रा. भोसरी) यांनी फिर्याद दिली. कल्पेश बिबिशन धनवे (रा. पिंपरी) आणि आयुश अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी सिगारेट घेऊन सिंग यांना पैसे दिले. सिंग यांनी पैसे ड्रॉवरमध्ये ठेवले. त्यानंतर आरोपींनी लगेच ड्रॉवरमध्ये हात घालून पाचशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले. सिंग यांना शिवीगाळ करण्यात आली, तसेच त्यांच्या मानेवर कोयत्याने वार करण्यात आला.
...
रिक्षात प्रवासी घेण्यावरून मारहाण
पिंपरी ः रिक्षामध्ये प्रवासी घेण्यावरून एकाला लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आली. भोसरीमधील पीएमटी चौकात हा प्रकार घडला. याप्रकरणी रिक्षाचालक अजय गजानन खानझोडे (वय २३, रिक्षा चालक, रा. चाकण) यांनी फिर्याद दिली. ते रिक्षात प्रवासी घेत होते. त्यावेळी आरोपी संकेत रावते (वय २४, मोशी) आणि त्याचा एक साथीदार आला. त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ आणि मारहाण केली. भांडण सोडविण्यास फिर्यादीचा मित्र रोहन सुधाकर डोंगरे (वय २६, रा. भोसरी) आला. त्याला आरोपींनी लोखंडी पाइपने मारहाण केली. त्या ठिकाणाहून जाणारे काबुल हुसैन रहमत (वय ३३, रा. भोसरी) यांच्या डोक्यावरही आरोपींनी पाइप मारून त्यांना गंभीर जखमी केले.
...
हिंजवडीत गांजा विकणाऱ्यास अटक
पिंपरी ः हिंजवडी परिसरात गांजाविक्री प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्रिलोकिनाथ रमेश गुप्ता (वय ३४, रा. हडपसर, मुळ उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सहाय्यक निबंधक मुळशी क्रमांक दोन कार्यालयासमोरील परिसरात तो गांजा विक्री करीत होता. गीता (रा. भाटनगर, पिंपरी) नावाच्या महिलेकडून गांजा घेतल्याची कबुली आरोपीने दिली. त्यामुळे पोलिसांनी तिच्यावरही गुन्हा दाखल केला. त्रिलोकिनाथकडून १४६ ग्रॅम गांजा, दुचाकी, मोबाईल आणि रोख रक्कम असा ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

Pune Crime : येरवड्यात दारू पिताना वाद, लाकडी दांडक्याने मित्राचा खून

Maha Shivratri 2026 Travel Tips: महाशिवरात्रीला महादेवाच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायला जाताय? मग 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Maha Shivratri 2026: भगवान भोलेनाथांकडून जीवनातील 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी शिका, कधीच येणार नाही अपयश

SCROLL FOR NEXT