पिंपरी-चिंचवड

तिसरी-चौथी मार्गिका अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत

CD

पिंपरी, ता. ५ : पुणे-लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचा सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) ‘मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन’ने (एमआरव्हीसी) रेल्वे मंत्रालयाला सादर केला आहे. तो अंतिम करण्याचे काम सुरू असून त्यानंतर तो केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात येणार आहे. या मार्गिकांना आता तरी मंजुरी मिळण्याची अपेक्षा प्रवासी व्यक्त करत आहेत.
पुणे-लोणावळा हा ६३ किलोमीटरचा मार्ग असून यावरून दररोज ७९ एक्स्प्रेस, ४१ लोकल आणि मालवाहतुकीच्या रेल्वे धावतात. मध्य रेल्वे आणि विशेषत: पुणेकरांसाठी तिसरी आणि चौथी मार्गिका महत्त्वाची आहे; पण गेल्या अनेक वर्षांपासून केवळ आश्वासने दिली जात आहेत. तत्कालिन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या सूचनेनुसार रेल्वे बोर्डाने २०१५ मध्ये या मार्गिकांना मंजुरी दिली होती. अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली. एकूण खर्चाच्या अर्धा-अर्धा निधी केंद्र आणि राज्य शासनाने देण्याचे ठरले होते.
यानंतर पहिला ‘डीपीआर’ २०१८-१९ मध्ये सादर करण्यात आला. राज्य सरकारच्या सूचनेनंतर मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनने सुधारित ‘डीपीआर’ ४ जुलै २०२३ रोजी सादर केला होता. मात्र, दोन वर्षे तो राज्य शासनाच्या मुंजरीच्या प्रतीक्षेत होता. अखेर १९ ऑगस्ट २०२५ रोजी राज्य सरकारच्या पायाभूत समितीने या प्रकल्पाला मंजुरी दिली. राज्य सरकार या मार्गिकांसाठीचा खर्चाचा अर्धा वाटा उचलणार आहे. राज्य शासनाच्या अंतिम मंजुरीसह ‘एमआरव्हीसी’ने डीपीआर रेल्वे मंत्रालयाला सादर केला आहे. रेल्वे मंत्रालयाकडून ‘डीपीआर’ अंतिम करण्याचे काम सुरू आहे.

पुणे-लोणावळा तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचा ‘डीपीआर’ राज्य शासनाच्या अंतिम मुंजरीसह रेल्वे मंत्रालयाला पाठविला आहे. रेल्वे मंत्रालय आणि केंद्र शासनाच्या मंजुरीनंतर काम सुरू होईल.
- विलास वाडेकर, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, ‘एमआरव्हीसी’

- प्रकल्पाविषयी थोडक्यात
पुणे ते लोणावळा लांबी - ६३ किलोमीटर
प्रकल्पासाठी अपेक्षित खर्च - ५,१०० कोटी रुपये
जमिनीची आवश्यकता - ६८.९१ हेक्टर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेची लाट तर या भागांत अवकाळी पाऊस लावणार हजेरी, आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान ? जाणून घ्या

पाणी मागणाऱ्या ६० वर्षीय वृद्ध महिलेला ‘मुले चोरणारी’ समजून मारहाण, नागपूरमधील धक्कादायक प्रकार...

Pune Accident: नवले पूलनंतर पुन्हा भीषण अपघात! जांभूळवाडीत ट्रक धडकून चालकाचा मृत्यू

Latest Marathi Live Update: सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या विश्वस्त नियुक्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती

Iran US Israel War : ‘होर्मुज’ला उत्तर ‘खार्ग’ने? बेट छोटं पण इराणच्या तेलसाम्राज्याचं हृदय... आता जगाला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT