पिंपरी-चिंचवड

चालकाची तक्रार करण्यासाठी हवा खासगी बसमध्ये दूरध्वनी क्रमांक

CD

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ५ ः हिंजवडीमधील दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर आता प्रत्येक खासगी बसमध्ये चालकाची तक्रार करण्यासाठी एक दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध करण्याचा आदेश पिंपरी चिंचवडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांनी दिला. गुरुवारी (ता. ४) येथील आरटीओ कार्यालयातील रस्ता सुरक्षा सभागृहात खासगी बस वाहतूक संघटनांचे पदाधिकारी आणि आरटीओ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
या दुर्घटनेत तीन भावंडांना जीव गमवावा लागला होता. खासगी बसच्या चालकाने मद्यपान केल्याचे आढळून आले होते. त्यानंतर खासगी बस वाहतुकीबाबत विविध पातळ्यांवरून टीका होत आहे. या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर आरटीओ प्रशासनाने ही बैठक घेतली होती. या बैठकीत विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले.
यावेळी चव्हाण यांनी विविध सूचना दिल्या. चालकांनी अधिक सुरक्षीत व रहदारीला अडथळा न होता बस चालवावी, असे त्यांनी नमूद केले. काही बस मालकांनी वाहनामध्ये स्वखर्चाने ‘ब्रेथ ॲनलायझर’ बसविले आहे. चालकाने त्याचा वापर केल्याशिवाय बस सुरू होत नाही. अशाप्रकारे ‘ब्रेथ ॲनलायझर’ वाहनाच्या इंजिनला जोडण्याबाबत इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आरटीओमार्फत करण्यात आले. एक ॲप तयार करण्यात आले असून यामध्ये बसची व चालकाची संपूर्ण माहिती भरण्याचे काम सूरू असल्याची माहिती, संघटनांकडून देण्यात आली.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT