पिंपरी-चिंचवड

सकाळ संवाद

CD

चऱ्होली बुद्रूक येथील डी. वाय. पाटील रस्ता परिसरातील साई मंदिराच्या मागील भागात मागील आठ-नऊ महिन्यांपासून सांडपाणी वाहिनी फुटलेली असून, सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही तात्पुरती कारवाई करण्यात येत आहे. सांडपाणी वाहिनी दुरुस्त न केल्याने परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर सांडपाणी साचल्यामुळे डेंगी, मलेरिया यांसारख्या साथीचे आजार वाढत आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिलांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. परिसरात असह्य दुर्गंधी पसरली असून स्वच्छतेच्या दृष्टीने वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीवर स्थानिक अधिकाऱ्यांना अनेक वेळा संपर्क करूनही चालढकल करण्यात येत आहे. भविष्यात अशी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी.
- निर्गुण थोरे, चऱ्होली बुद्रूक
PNE25V74159,

लक्ष्मी चौक ते ऍमस्टरडॅम हॉटेल हिंजवडी दरम्यानच्या रस्त्यावर खड्डे झाले असून रस्त्याची चाळण झाली आहे. पावसाळा संपून दोन महिने झाले तरीही रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही. हा रस्ता धोकादायक व अपघाताला निमंत्रण देणारा आहे. त्यामुळे या रस्त्याची ताबडतोब दुरुस्ती करावी.
-विवेक मैत्र, चिंचवड
PNE25V74161

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Update: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT