पिंपरी-चिंचवड

दडलेला विनोद शोधण्याची नजर हवी

CD

पिंपरी,ता. ७ : ‘‘आजकाल माणसे हसायचे विसरली आहेत. खरं म्हणजे प्रत्येक गोष्टीत विनोद दडलेला असतो; परंतु तो शोधण्याची नजर मात्र आपल्याकडे हवी,’’ असे विचार सुप्रसिद्ध एकपात्री हास्यकलाकार प्रा. अजितकुमार कोष्टी यांनी केले.
नमस्कार फाउंडेशनच्या वतीने आयोजित पाच दिवसीय नमस्कार महोत्सवात ‘हसवणूक’ हा हास्यविनोदाचा कार्यक्रम सादर करताना प्रा. कोष्टी बोलत होते. यावेळी त्यांनी ‘गण्या’ या काल्पनिक पात्राच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक विसंगती नमूद करून श्रोत्यांना हसवले.
तत्पूर्वी ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव यांनी फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष सुहास जोशी यांची प्रकट मुलाखत घेतली. जोशी म्हणाले, ‘‘हिंदी आणि इंग्रजी माध्यमांतून शिक्षण झाल्यामुळे मला अस्खलित मराठी बोलता येत नव्हते. एकदा योगायोगाने मी प्रशांत दामले यांनी अभिनय केलेले नाटक पाहिले. तेव्हापासून मराठी भाषा आणि मराठी नाटकांच्या प्रेमात पडलो. मराठी कलाकारांना मानसन्मान मिळावा, म्हणून नमस्कार फाउंडेशनची स्थापना केली. माधुरी ओक यांनी सूत्रसंचालन केले.
दरम्यान, या महोत्सवात आयोजित ‘करून गेलो गाव’ या नाटकालाही रसिकांनी प्रतिसाद दिला. राहुल भंडारे आणि महेश मांजरेकर निर्मित, राजेश देशपांडे लिखित या नाटकात अभिनेता भाऊ कदम यांनी ‘अण्णा’ ही मध्यवर्ती भूमिका बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT