पिंपरी-चिंचवड

निष्ठा टिकवणाऱ्यांचा पाठीशी जनता उभी

CD

पिंपरी, ८ ः ‘राजकारणात दिवस येतात आणि जातात, पण जो निष्ठा टिकवून राहतो त्याच्या पाठीशी जनता उभी राहते. सर्व निष्ठावंताच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत,’ असे प्रतिपादन खासदार नीलेश लंके यांनी व्यक्त केले. नेहरूनगर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पिंपरी चिंचवड शहर संपर्क कार्यालयाचे उद्‍घाटन खासदार लंके आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या उपस्थितीत झाले.
शहराध्यक्ष तुषार कामठे, राहुल कलाटे, सुलक्षणा शीलवंत, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक शहराध्यक्ष इमरान शेख, पुणे शहर महिला अध्यक्ष स्वाती पोकळे, पिंपरी चिंचवड महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर, युनूस भाई शेख, अरुण पवार आदी यावेळी उपस्थित होते.
लंके म्हणाले, ‘‘लोकसभा निकालानंतर पिंपरी चिंचवड शहरातील लोक आमच्या पक्षात येण्यासाठी मागे लागले होते. आम्ही त्यांना संधी देखील दिली. विधानसभा निवडणूक संपताच ते पक्ष सोडून पळून गेले.’’
रोहिणी खडसे म्हणाल्या, ‘‘सत्ताधारी व निवडणूक आयोगाच्या वतीने देशभरात मतदार याद्यात घोळ सुरू आहे. पिंपरी चिंचवडमध्येही प्रत्येक प्रभागातील नावे जाणून-बुजून दुसऱ्या मतदारसंघात टाकण्यात आली आहेत. निवडणुकीसंदर्भात लोकांमध्ये असंतोष आहे. अशीच परिस्थिती राहिली तर भारतात देखील बांगलादेश नेपाळ यासारखे आंदोलन उभे राहील ही शक्यता नाकारण्यात येत नाही.’’
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Adhav refused Maharashtra Bhushan honour :...म्हणून बाबा आढाव यांनी नाकारला होता राज्याचा सर्वोच्च सन्मान, ‘महाराष्ट्र भूषण’!

अविश्रांत चळवळ! अखेरपर्यंत श्रमिकांसाठी लढत राहिले, सहा वर्षांपासून 'या' दुर्धर आजाराशी दिला लढा

Pune Airport Road Crash : मद्यधुंद चालकाची बेफाम गाडी; एअरपोर्ट रस्त्यावर तीन वाहनांचा अपघात; विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल!

Baba Adhav: ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन, उपेक्षितांच्या लढ्याचा नायक हरपला

Baba Adhav and Politics : प्रचंड लोकप्रियता असूनही बाबा आढाव राजकारणापासून का राहिले दूर?

SCROLL FOR NEXT