पिंपरी-चिंचवड

अमित गोरखे यांच्याकडून विकास कामांचे उद्‍घाटन

CD

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ८ ः आमदार अमित गोरखे यांच्या विकास निधीमधून शाहूनगर परिसरात ट्रान्सफॉर्मर बदलण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील विद्युत व्यवस्थेची गुणवत्ता आणि सुरक्षितता मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होणार असून नागरिकांच्या दीर्घकाळाच्या मागणीची पूर्तता होणार आहे. सोमवारी (ता. ८) गोरखे यांच्या प्रमुख उपस्थितीत कामाचा शुभारंभ व भूमिपूजन सोहळा पार पडला.
यावेळी विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश देवकर, ज्युनिअर अभियंता अशोक जाधव, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, योगेश बाबर, विशाल काळभोर, कैलास कुटे, संदीप थोरात, सोसायट्यांचे चेअरमन, सचिव व सर्व सभासद देखील उपस्थित होते.
पिंपरी शहरातील विविध प्रभागांमध्ये आमदार अमित गोरखे यांच्या विकास निधितून विविध विकासकामे सुरु आहेत. यामध्ये काळभोरनगर व आसपासच्या भागात ज्येष्ठ नागरिकांसाठी ओपन जिम साहित्य, विद्यानगर तसेच काळभोर नगर मधील अंतर्गत सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते, पिण्याच्या पाण्याची नवीन पाइपलाइन टाकणे, ड्रेनेज प्रणालीचे बळकटीकरण तसेच आवश्यक ठिकाणी वीजवाहिन्यांची उभारणी अशी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
------------

परिसरातील प्रत्येक नागरिकाला स्थिर विद्युतपुरवठा मिळणे ही प्राथमिक जबाबदारी आहे. नागरिकांची सुरक्षा सर्वात महत्त्वाची असल्याने वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंगसारखी कामे अत्यंत गरजेची आहेत. या कामामुळे भविष्यातील तांत्रिक अडचणी दूर होतील आणि नागरिकांना अधिक सुरक्षित, सुविधा मिळतील. लोकांच्या गरजा ओळखून अशा विकासकामांना आम्ही कायम प्राधान्य देत राहू. शहराच्या विकासात आम्ही कुठेही काही कमी पडू देणार नाही.

- आमदार अमित गोरखे
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

"‘तू मेरा दिल, तू मेरी जान’ म्हणत रियान परागची उदास वैभव सूर्यवंशीला जादू की झप्पी; Video Viral, एकदा नक्की पाहाच नेमकं काय घडल?"

Chai-Sutta Culture and Health Risks: चहाच्या टपऱ्यांपासून ट्युमरपर्यंत: भारताची ‘चाय-सुट्टा-ब्रेक’ संस्कृती फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या संकटाला खतपाणी घालत आहे का?

Yavatmal: पत्नीच्या खुनात पतीला सश्रम कारावास; बीएनएसस कायद्यांतर्गत प्रकरण निकाली; तक्रारीचे अभिलेख ठरले महत्वाचे

SCROLL FOR NEXT