पिंपरी-चिंचवड

केबल कंपन्यांना विद्युत पोलवरून केबल्स टाकण्याची परवानगी कोणाची?..

CD

केबल कंपन्यांना विद्युत पोलवरून केबल्स टाकण्याची परवानगी कोणाची?..

पिंपरी, ता.८ ः :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत गेल्या अनेक वर्षांत शहरात मोठ्या प्रमाणावर नवीन विद्युत पोल बसविण्यात आले आहेत, यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, अद्याप वापरात असलेले पोल अस्तित्वात असूनही पुन्हा नव्याने पोल बसविण्याचा घाट घालण्यात येत आहे. असा आरोप पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती सदस्य संतोष सौंदणकर यांनी आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात सौंदणकर यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात महानगरपालिका व स्मार्ट सिटी मिशन च्या मार्फत नव्याने बसविण्यात येणाऱ्या पोलवर एलईडी दिवे बसविले जात आहेत. तथापि, या एलईडी दिव्यांपैकी अनेक ठिकाणी काही दिवे बंद तर काहीच दिवे चालू असल्याचे चित्र दिसून येते. देखभाल व दुरुस्तीबाबत महापालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.


दरम्यान आयुक्तांनी मागील दहा वर्षात शहरात एकूण किती पोल बसविण्यात आले?,पथदिवे किती वेळा बदलण्यात आले?
या कामांवर मागील दहा वर्षात किती खर्च झाला? बदललेले जुने पोल कुठे गेले ? पहिले पिवळे बल्ब, नंतर पांढऱ्या एलईडी आणि आत्ता पुन्हा पिवळे दिवे लावले जातात, असे का? पोलचे लाईफ 15 वर्षाचे असताना सुशोभीकरणासाठी 5 वर्षात पोल बदलणे योग्य आहे का ? याबाबत विद्युत विभागाकडे खुलासा मागवावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT