पिंपरी, ता. ७ : पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) परवडणारी घरे सोडत योजने अंतर्गत सुमारे सव्वातीन हजार अर्ज दाखल झाले असून त्यामधून पीएमआरडीएच्या तिजोरीत दोन कोटी ६६ लाख ८५ हजार रुपये जमा झाले आहेत. शेवटचे अतिरिक्त दोन दिवस अर्जदारांना बँक ट्रान्सफर अथवा आरटीजीएससाठी वेळ दिली होती. मात्र, एकाही अर्जदाराची रक्कम जमा झाली नाही.
पीएमआरडीएच्या सदनिकांसाठी तीन हजार २७१ अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहे. ती रक्कम २ कोटी ६६ लाख ८५ हजार आहे. सदनिकांच्या सोडतीची प्रारुप यादी १ जानेवारी २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यावर २ जानेवारीपर्यंत आक्षेप घेता येईल. १३ जानेवारीला सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध करत २१ जानेवारीला ड्राय रननंतर होईल. २२ जानेवारीला अंतिम सोडत काढल्यानंतर पीएमआरडीएच्या संकेतस्थळावर सोडतीमधील यशस्वी व प्रतिक्षा यादीवरील अर्जदारांची नावे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दरम्यान, ज्या अर्जदारांना सोडतीमध्ये घरे मिळाली नाहीत; त्यांना ती रक्कम परत करावी लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.