पिंपरी-चिंचवड

चिखलीला पाच वर्षांपासून डांबरीकरणाची प्रतीक्षा

CD

चिखली, ता.१ : चिखली परिसरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले असून गेल्या पाच वर्षांपासून रस्त्यांना डांबरीकरणाची प्रतीक्षा आहे. मात्र, आता पावसाळा सुरू झाल्याने रस्त्याचे डांबरीकरण होणार का? की अपघात होण्याची महापालिका वाट बघत राहणार ? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
चिखली परिसरातील अनेक रस्त्यांवर जलनिस्सारण, पावसाळी गटारे आणि विद्युत वाहिन्या इत्यादी प्रकारची कामे सुरू असून असंख्य खड्डे पडले आहेत. त्यातच भर म्हणून अंतर्गत भागांत अनधिकृत बांधकामे सुरू असल्याने भूमिगत वीज जोड आणि जलनिस्सारण वाहिन्या जोडण्यासाठी खोदाई करून नागरिकांनी रस्त्यांची अक्षरश: चाळण केली आहे. अनेक रस्त्यांवर गटारे फुटून त्यातील सांडपाणी रस्त्यांवरून वाहत आहे. त्यामुळे दुर्गंधीयुक्त पाण्यातून वाट काढत नागरिकांना जावे लागत आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे त्यात अधिकच भर पडली. चिखली अकोट या मुख्य रस्ता, कुदळवाडी चिखली हा जुना रस्ता त्याचबरोबर मोरे वस्ती, चिखली मेहेत्रे वस्ती इत्यादी भागांतील अंतर्गत रस्त्यावर खड्डे पडले असून मोरे वस्ती येथील अंगणवाडी या मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. नागरिकांना कर भरूनही रस्ता जलनिस्सारण अशा मूलभूत सुविधा ही मिळत नसल्याचे चित्र आहे.


पावसाने उघडीप दिल्यानंतर लगेचच डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात येईल. कारण, रस्त्यावर टाकण्यात येणारी खडी गरम करावी लागते आणि पावसाळी वातावरणात ते गरम होत नाही.
- व्ही. डब्ल्यू. वायकर, कार्यकारी अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका

PNE25V19191

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: 'नीट पेपर लीक' प्रकरणात सीबीआयकडून चार्जशीट दाखल; शिवराज मोटेगावकरसह 13 आरोपींचा समावेश

Pune Online Toy Car Scam: टॉय कारच्या ऑनलाइन खरेदीत शिवाजीनगरातील महिलेची पावणेचार लाखांची फसवणूक

Shraddha Chopde: 'ज्युदोच्या मॅट'वर शेतकरी कन्येचा सुवर्ण हुंकार! महाराष्ट्राची कन्या श्रद्धा चोपडे पदक जिंकण्यासाठी ग्लासगोला रवाना

Gang Rivalry Foiled: कृष्णा आंदेकरवरील गोळीबाराचा कट उधळला; नंदुरबारला जाताना पोलिस व्हॅनवर हल्ल्याची होती योजना

Shirur Temple Robbery: शिरूर जैन मंदिर दरोडा प्रकरणी तिघांना २५ महिन्यांचा कठोर कारावास; भाविकांत समाधान

SCROLL FOR NEXT