पिंपरी-चिंचवड

परिवहन विभागाचे संकेतस्थळ ‘डाउन’

CD

पिंपरी, ता. ९ : गेल्या काही दिवसांपासून परिवहन विभागाचे संकेतस्थळ वारंवार बंद पडत असल्याने नागरिकांची सातत्याने गैरसोय होत आहे. ऑनलाइन सुविधा उपलब्ध असूनही अर्ज प्रक्रियेत अडथळे येत असल्याने नागरिकांना आरटीओ कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
शासनाने लर्निंग लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरण, डुप्लिकेट लायसन्स, पत्ता बदल, तसेच इतर अनेक सेवा ऑनलाइन केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय कमी होऊन प्रक्रिया सुलभ होईल, अशी अपेक्षा होती. पण, गेल्या काही दिवसांपासून आरटीओतील संकेतस्थळ बंद होत आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्ज करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. अर्जाची प्रक्रिया पूर्ण झालीच तर पेमेंट होत नाही. इतर ऑनलाइन कामे करतानाही अडचणी येत आहेत.
नागरिकांना आरटीओसंबंधित काही कामांसाठी आरटीओत यावे लागते पण, आरटीओत आल्यानंतरही संकेतस्थळ बंद असल्याने नागरिकांची कामे होत नाहीत. यामध्ये प्रामुख्याने शिकाऊ वाहन परवाना काढणे, नवीन पक्के वाहन परवाना काढणे, कर्जाचा बोजा चढवणे-उतरवणे, वाहन परवाना नूतनीकरण, परमिट नूतनीकरण, वाहन ट्रान्स्फरची कामे बंद राहत आहेत. त्यामुळे नागरिकांना विनाकारण आरटीओच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. नागरिक आरटीओच्या कामासाठी सुट्टी काढून येतात. पण, कार्यालयात आल्यावर अचानक संकेतस्थळ बंद झाल्यामुळे कामच होत नाही. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामध्ये नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे. परिवहन विभागाला ऑनलाइन सेवांमधून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. तरीही संकेतस्थळाची नियमित देखभाल आणि तांत्रिक दुरुस्ती न केल्यामुळे ही समस्या वारंवार उद्‍भवत आहे.

‘‘मी माझ्या पत्नीचा शिकाऊ परवाण्यासाठी ७ नोव्हेंबर रोजी अर्ज केला होता. ८ डिसेंबर पर्यंत अर्ज मंजूर झाला नव्हता. शिकाऊ परवान्यासाठी जर एक महिना लागत असेल तर या ऑनलाइन सुविधेचा उपयोग काय?
- दत्तात्रय माने, नागरिक

‘‘सारथी संकेतस्थळाला गेल्या काही दिवसांपासून अडचणी येत आहेत. देशभरात या अडचणी येत आहेत. संकेतस्थळाबाबत आमच्या हातात काही नाही.
- राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Microsoft India Investment : 'मायक्रोसॉफ्ट' भारतात दीड लाख कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक करणार; सत्या नडेलांची मोठी घोषणा!

Dhananjay Munde: वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी 35 वकिलांची फौज; पैसा कोण पुरवतंय? कोर्टाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न

Latest Marathi News Live Update : देवेंद्र फडणवीस हे सावजीसारखे तिखट आणि संत्र्यासारखे गोड- एकनाथ शिंदे

Mumbai News: रिक्षाचालक मुंबईच्या गतीचे हृदय! मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन

Central Railway: नाताळ-नववर्षासाठी मध्य रेल्वेच्या ७६ विशेष गाड्या; पण कोणत्या मार्गावर? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT