पिंपरी-चिंचवड

‘आरटीओ’च्या नावे बनावट संकेतस्‍थळ, फसवे अॅप

CD

पिंपरी, ता. १२ : नागरिकांना बनावट चलन पाठवले जात असल्याच्या तक्रारी पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाकडे आल्या आहेत. तर, काही सायबर गुन्हेगार ‘आरटीओ’च्या नावे बनावट संकेतस्‍थळ, फसवे ॲप पाठवत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. ‘आरटीओ’च्या नावे येणाऱ्या मेसेज, ॲपबाबत शंका असल्‍यास नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वाहन परवाना, वाहन नोंदणी, ई-चलन यांसारख्या महत्त्वाच्या सेवांशी संबंधित बनावट संकेतस्थळ लिंक, फसव्या अॅप फाइल, आणि संदेश काही नागरिकांना विशेषत: व्हॉट्स ॲपवर येत आहेत. काही संदेशातून लिंक पाठवत दंडाचे चलन भरण्यास सांगितले जात आहे. पिंपरी चिंचवड ‘आरटीओ’ क्षेत्रातही असे प्रकार उघडकीस आले आहेत. काहींनी याबाबत थेट ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत तक्रारही केली आहे. त्यावर आता ‘आरटीओ’कडून जनजागृती सुरू करण्यात आली आहे.

शासकीय संकेतस्थळांवरून आलेले संदेश गृहित धरा
वाहन नोंदणीसाठी vahan.parivahan.gov.in, सारथी वाहन परवाना सेवेसाठी sarathi.parivahan.gov.in, परिवहन सेवेसाठी parivahan.gov.in ई-चलन पोर्टल हे echallan.parivahan.gov.in ही सर्व शासकीय संकेतस्थळे ‘gov.in’ ने समाप्त होतात. अशा अधिकृत संकेतस्‍थळावरून आलेले संदेशच गृहित धरण्याचे आवाहन ‘आरटीओ’ने केले आहे.

या लिंक ओपन करणे टाळा
.com (डॉट कॉम), .online(डॉट ऑनलाइन), .site (डॉट साइट), .in (डॉट इन) या आणि अशा इतर डोमेनच्या लिंकद्वारे वेबसाइट्स उघडण्याचे टाळावे, असे आरटीओकडून सांगण्यात आले.

फसव्या ॲप लिंक, अनधिकृत लिंक
फसवणूक करणाऱ्यांकडून सामान्यतः ‘तुमचे चलन बाकी आहे’, ‘तत्काळ दंड भरा’ असे संदेश पाठवून नागरिकांना अनधिकृत लिंकवर क्लिक करण्यास भाग पाडले जाते. तसेच ‘RTO Services.apk’, ‘eChallan Pay.apk’ किंवा ‘mParivahan Update.apk’ अशी फसवी ॲप डाउनलोड करण्यास सांगितले जाते. ज्याद्वारे मोबाइलमधील माहिती चोरी जाण्याचा धोका असतो. आरटीओ किंवा परिवहन विभागाकडून कधीही व्‍हॉटसपद्वारे पेमेंट लिंक पाठवली जात नाही, याची नागरिकांनी विशेष नोंद घ्यावी, असे कार्यालयाकडून सांगण्यात आले.


चलन भरण्याबाबत लिंक आल्‍यानंतर खात्री करणारा ई-मेल आम्‍हाला नागरिकांकडून प्राप्‍त झाला आहे. त्‍यावरून आम्‍ही नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही संशयास्पद संदेश, लिंक किंवा व्यवहार आढळल्यास नागरिकांनी cybercrime.gov.in या संकेतस्‍थळावर, तसेच सायबर फसवणूक हेल्पलाइन १९३० वर किंवा जवळच्‍या जिल्हा सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. अधिकृत शासकीय पोर्टल वापरा आणि संशयास्पद लिंकपासून दूर राहा.
- संदेश चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin: लाडक्या बहिणींसाठी २०० कोटींची तरतूद; राज्यात १० मॉल उभे करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

US Birth Tourism: गर्भधारणेदरम्यान अमेरिकेत प्रवास करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! यूएस दूतावासाकडून व्हिसा रद्द करण्याचा इशारा, कारण काय?

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात १९ तारखेला दोषारोप निश्चिती? सुनावणीत नेमकं काय घडलं?

Pune News : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात ३ हजार कोटींचा विकासधडाका; सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम!

Latest Marathi News Live Update: पवईत आढळले दोन अजगर, रेस्क्यू टीम घटनास्थळी

SCROLL FOR NEXT