पिंपरी-चिंचवड

जाधव व दळवी यांना जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार

CD

सोमाटणे, ता.१३ ः शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांना पुणे जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक व गुणवंत शिक्षक कर्मचारी पुरस्कार दरवर्षी दिला जातो. या वर्षी हे दोन्ही पुरस्कार पवनमावळाने पटकावले.

शिवली येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रेय जाधव यांना आदर्श मुख्याध्यापक व आढले येथील कर्मवीर विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी तसेच वासुदेवाच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे देणारे विठ्ठल दळवी यांना गुणवंत शिक्षक कर्मचारी हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराचे वितरण राज्य शिक्षकेतर महामंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव खांडेकर व माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते झाले. दळवी यांना यापूर्वी विविध सामाजिक, शैक्षणिक संघटनांच्या वतीने एकतीस पुरस्कार देण्यात आले असून हा त्यांचा बत्तीसावा पुरस्कार आहे. याबद्दल शिवली शाळेच्या वतीने जाधव आणि दळवी यांचा सत्कार करण्यात आला.

NE25V75960

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

Odisha Tragedy : ओडिशात मोठी दुर्घटना ! रुग्णालयाला भीषण आग; ICU मधील १० रुग्णांचा गुदमरुन मृत्यू

'फक्त ब्रा घालून किसिंग सीन करायला लावायचे' अभिनेत्रीने केली प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोलखोल, म्हणाली, 'प्रत्येक सीनमध्ये इंटिमेन्सी..'

Dubai Airport Drone Attack : दुबई विमानतळावर इराणचा ड्रोन हल्ला ! आकाशात धुराचे लोट, विमानसेवा विस्कळीत

Pune News : ‘मसाप’मध्ये दहा वर्षांनी सत्तापालट

SCROLL FOR NEXT