पिंपरी-चिंचवड

पूर्णानगरचे नागरिक समस्यांमुळे त्रस्त

CD

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १३ ः शनिमंदिर पूर्णानगर येथे स्व. पंडित दीनदयाळ क्रीडांगण परिसरात भरणारा आठवडे बाजार व विविध कार्यक्रमांमुळे अस्वच्छता, वाहतूक कोंडी होते. अस्ताव्यस्त वाहने आणि गर्दीमुळे ज्येष्ठ नागरिक, महिलांना चालणे अवघड होते. पालिका प्रशासन आणि पोलिसांनी तत्काळ लक्ष देऊन या समस्यांमधून सुटका करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
या परिसरातील नागरिक, ज्येष्ठ महिला व पुरुष रोज सकाळी-सायंकाळी फिरायला जातात. स्व. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी गार्डन येथील महाबली चौक ते स्व. पंडित दीनदयाळ क्रीडांगण  शनिमंदिर येथे प्रत्येक शनिवारी आठवडे बाजार  भरतो.
सध्या निवडणुकीचे वारे वाहत असल्यामुळे विविध सामाजिक, राजकीय पक्षांकडून कार्यक्रम होत आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा चारचाकी-दुचाकी वाहने अस्ताव्यस्त लावली जातात. रस्ता ओलांडताना किंवा वाहन चालविताना नागरिकांचा जीव अक्षरशः मेटाकुटीला येतो. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. गर्दीत महिलांचे मंगळसूत्र चोरी होण्याच्या घटना समोर आल्या आहेत.
गेल्या दहा दिवसांत दोन घटना घडल्या आहेत, मात्र याकडे ना वाहतूक पोलिसांकडून कारवाई होते, ना पालिकेचे अतिक्रमण पथकाकडून धडक कारवाई होते. त्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
-------
पालिकेतर्फे नियमित सफाई, स्वच्छता व संवर्धन होणे आवश्यक आहे. वाहतूक कोंडीवरही उपाययोजना करण्याची गरज आहे. पालिका व पोलिस प्रशासनाने या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात.
- सुनील कदम, संस्थापक अध्यक्ष, पूर्णानगर विकास कृती समिती
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai Crime : सावधान ! नवी मुंबईत भीक मागणाऱ्या टोळीचा हनी ट्रॅप, भर रस्त्यात 'असं' शोधल जातं सावज, आतापर्यंत अनेकांना लुटले

Sangli ZP Mahayuti : 'झेडपी'त सव्वा वर्षांचे चार अध्यक्ष करू, चंद्रकांतदादांची भूमिका; शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला प्रस्ताव

Gadhinglaj Panchayat : पक्षांपेक्षा गाव जिंकले! गडहिंग्लजमध्ये ‘आमचा गाव, आमचा उमेदवार’च्या लाटेत अनेकांचा दणदणीत विजय

Ajit Pawar work documentation : अजित पवार यांच्या कार्याचा समृध्द दस्तऐवज तयार होणार, ३५ वर्षातील कार्याला उलगडा होणार

Latest Marathi News Live Update : वर्धा-तुळजापूर दरम्यान जीटी एक्सप्रेसला भीषण आग

SCROLL FOR NEXT