पिंपरी-चिंचवड

कमी गर्दीमुळे रात्रीची रस्ते सफाई प्रभावी

CD

पिंपरी, ता. १४ : दिवसा शहरातील रस्त्यांवर वाहनांची आणि नागरिकांची गर्दी असते. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेकडून शहरातील रस्त्यांची साफसफाई रात्री करण्यात येत आहे. वाहनांचा अडथळा होत नसल्यामुळे रात्री उशिरा केली जाणारी स्वच्छता मोहीम प्रभावी ठरत असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.
स्वच्छता मोहिमेत कचरा संकलन, रस्त्यांची यांत्रिक स्वच्छता, कडेकपारीतील घाण काढणे, धूळ-माती साफ करणे यांसारखी विविध कामे केली जात आहेत. नव्या अत्याधुनिक वाहनांचा वापर आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या मदतीमुळे मोहिमेचा वेग वाढवण्यात आला आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत, असे अधिकारी सांगत आहेत.
दररोज सुमारे २५ टन कचरा संकलित केला जात आहे. अनेक मुख्य रस्ते, व्यावसायिक भाग आणि महत्त्वाच्या चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात स्वच्छता केली जात आहे. रात्रीच्या वेळी रहदारी कमी असल्याने यांत्रिक झाडू व इतर यंत्रणा अधिक प्रभावीपणे वापरता येतात. नवी उपकरणे, तैनात कर्मचारी आणि वेळेचे सुयोग्य नियोजन यामुळे ही मोहीम यशस्वी ठरत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
------

स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी असून, आपला कचरा योग्य विलगीकरण करून महापालिकेच्या घंटागाडीला द्यावा. शहर स्वच्छतेसाठी नागरिकांचे सहकार्य केल्यास ही मोहीम अधिक तीव्र स्वरूपात राबवून शहराच्या इतर भागांतही साफसफाई केली जाईल.
- डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, आरोग्य विभाग, महापालिका
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

Toll Tax Rule Change : सरकारने बदलला टोल नियम!, आता अपूर्ण ‘एक्सप्रेस-वे’वर नाही होणार वसूली

Pune News : आयफोन विमा दावा नाकारल्याप्रकरणी ग्राहक आयोगाचा मोठा निर्णय; ८९ हजार परत करण्याचे आदेश

IND vs NAM : ७ षटकांत १०४ धावा चोपणारा भारत २०९ वर का अडकला? India vs Pakistan लढतीपूर्वी चिंता वाढवणारी गोष्ट

T20 WC IND vs NAM : इशान किशन, हार्दिक पांड्या बरसले, भारताने अनेक विक्रम नोंदवले; शेवटच्या १२ चेंडूंत ५ विकेट्स पडल्या

SCROLL FOR NEXT