पिंपरी-चिंचवड

पुणे मॅरेथॉन (पोलिस आयुक्त चषक)

CD

पुणे, ता.१४ ः बजाज पुणे अर्ध मॅरेथॉन स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलिस (पुरुष) संघाने २ तास १४ मिनिटे ९ सेकंद इतकी वेळ नोंदवत ‘पोलिस आयुक्त’ चषक पटकाविला. एसआरपीएफ (आयडीसी) संघ (२ तास २५ मिनिटे २ सेकंद) उपविजेता राहिला. तर महाराष्ट्र पोलिस संमिश्र संघाने (२ तास ३४ मिनिटे ३२ सेकंद) तृतीय स्थान प्राप्त केले.
पोलिस उपायुक्त (परिमंडळ चार) सोमय मुंडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. विजेत्या संघाच्या ओंकार कुंभार, हर्षवर्धन दबडे, दिनकर महाले, लक्ष्मण दरवडा यांनी पारितोषिकाचा स्वीकार केला. उपविजेता संघात हनुमंत मडावी, अमित सोनुले, सुरेश कोरडे, प्रभाकर गहले यांचा सहभाग राहिला. तृतीय क्रमांकाच्या संघामध्ये शिवम कापले, यामिनी ठाकरे, सोनाली देसाई, प्रदीप घोडे यांचा समावेश होता. संपूर्ण राज्यामधून सुमारे ९०० पोलिस धावपटूंनी स्पर्धेत भाग घेतला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा त्यांचा सहभाग अधिक राहिला.
विजेत्या संघाचे सदस्य हर्षवर्धन दबडे म्हणाले,‘‘आम्ही या स्पर्धेत पहिल्यांदाच सहभाग घेतला. त्यासाठी आम्ही सहा महिन्यांपासून सराव करत होतो. आता फेब्रुवारी महिन्यात ऑल इंडिया पोलिस क्रॉसकंट्री स्पर्धेत सहभागी होऊन चांगली कामगिरी करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.’’
पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा शारीरिक तंदुरुस्तीसाठी मॅरेथॉनमध्ये सहभाग वाढत आहे. ही स्वागतार्ह बाब आहे. स्पर्धेचे नियोजन चांगले राहिले, असे कौतुकोद्‍गार मुंडे यांनी काढले.


पेसर प्रतिक्रिया
बजाज पुणे मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे माझे हे तिसरे वर्ष आहे. पुण्यातील ही सर्वात मोठी स्पर्धा ठरली आहे. यंदा स्पर्धेचे ठिकाण बदलल्याने उत्सुकता निर्माण झाली.
- विशाल पाटील, पेसर, मुंबई

गेल्या आठ वर्षांपासून मी विविध मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहे. परंतु, बजाज पुणे मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याचे हे माझे पहिले वर्ष आहे. स्पर्धकांमध्ये उत्साहाचे वातावरण राहिले. स्पर्धेचे नियोजन उत्तम होते.
- जतीन राठोड, पेसर, मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Awards: विश्वविजेत्यांचा सन्मान, द्रविड-मिताली राजला जीवनगौरव, तर गिल-मानधना सर्वोत्तम क्रिकेटर; पाहा विजेत्यांनी संपूर्ण यादी

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

Latest Marathi Live Update : ड्रग्स तस्करी प्रकरणी मुंबईच्या पुरवठादारासह दोघांना पोलिस कोठडी

कोणताच संघ ICCपेक्षा मोठा नाही, जय शहांनी पाकिस्तान-बांगलादेशला सुनावलं; तर टीम इंडियाला...

SCROLL FOR NEXT