पिंपरी-चिंचवड

शहरात अनधिकृत जाहिरात फलकांचे पेव

CD

पिंपरी, ता. १५ : महापालिका निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने इच्छुकांनी शहरभर अनधिकृत जाहिरात फलक, किऑस्क आणि होर्डिंग्ज लावण्याचा सपाटा लावला आहे. रस्त्यांच्या दुतर्फा, चौकात, उड्डाणपुलांखाली, वीजखांबांवर तसेच सार्वजनिक भिंतींवर मोठ्या प्रमाणावर हे फलक झळकत आहेत. महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाकडून कारवाई केली जात नसल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराचे विद्रूपीकरण होत आहे.
महापालिकेच्या नियमांनुसार जाहिरात फलक लावण्यासाठी आकाशचिन्ह परवाना विभागाची परवानगी आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक इच्छुक उमेदवार नियम धाब्यावर बसवून बिनधास्तपणे जाहिरातबाजी करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे निवडणूक आचारसंहिता लागू होण्याआधीच शहरात अशा फलकांची संख्या वाढली आहे. जाहिरात फलकांमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघाताचा धोका देखील वाढला आहे. महापालिकेने यापूर्वी अनधिकृत जाहिरात फलकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. तरीही सध्या शहरात अशा फलकांवर कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे आकाशचिन्ह परवाना विभाग नेमके काय करत आहे ? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. काही ठिकाणी तर महापालिकेच्या मालकीच्या जागांवरच बेकायदेशीर फलक लावण्यात आले असून प्रशासनाच्या दुर्लक्षावर नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

दंडात्मक कारवाईची मागणी
शहर सुशोभीकरणासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना, अनधिकृत जाहिरातींमुळे हे प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचे चित्र आहे. नियम सर्वांसाठी समान असतील तर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनाही त्याचे पालन करणे बंधनकारक करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. महापालिकेने तातडीने शहरातील सर्व अनधिकृत जाहिरात फलक, किऑस्क आणि होर्डिंग्ज हटवून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी, अन्यथा नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास डळमळीत होईल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

--------
पदपथावरच अनधिकृत फलक
काळेवाडी, रहाटणी, थेरगाव, वाकड, ताथवडे, पुनावळे आणि रावेत परिसरात पादचाऱ्यांसाठी असलेल्या पदपथांवरच बांबू व लाकडाचा ढाचा उभारून अनधिकृत जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी अडथळे निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. चिखली, भोसरी, पिंपरी, कासारवाडी, पिंपळे गुरव, सांगवी व दापोडी भागांतही मुख्य चौक, बाजारपेठा व कार्यालयांसमोर बेकायदेशीर जाहिराती झळकत आहेत. यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत असून सर्व अनधिकृत फलक तातडीने हटवावेत, अशी मागणी नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

---------

अतिक्रमण पथक नावालाच
अनधिकृत जाहिरात फलकांवर दररोज कारवाई करण्यासाठी महापालिकेने आठ ही क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र भरारी पथके नेमली आहेत. नागरिकांचा विरोध झाला तरी सुरक्षारक्षकांच्या संरक्षणात कारवाई करण्याचे अधिकार या पथकांना देण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात उपनगरांत या पथकांच्या गाड्या फिरताना दिसतात, पण अनधिकृत फलक हटविताना त्यांचे हात धजावत नसल्याचे चित्र आहे. कारवाई का होत नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. कारवाईस चालढकल करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवरच कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

-------
कारवाईचा तपशील
- मागील सात महिन्यांत महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाकडून कारवाई
- शहरातील अनधिकृत जाहिरात फलक, किऑस्क व होर्डिंगवर कारवाई
- एकूण दोन लाखांहून अधिक अनधिकृत जाहिरात फलक हटविण्यात आले
- कारवाईदरम्यान संबंधितांकडून सुमारे २५ लाख रुपयांचा दंड वसूल

- नियमबाह्य जाहिरातींमुळे होणारे शहराचे विद्रूपीकरण टाळण्याचा प्रशासनाचा दावा


क्षेत्रीय कार्यालय स्तरावर दररोज किमान शंभर अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई केली जाते. मात्र, कारवाईनंतर रात्रीतून पुन्हा त्या ठिकाणी जाहिरात फलक उभे केले जातात. एकाने फलक लावला की ते पाहून इतरांकडूनही तशीच जाहिरातबाजी केली जाते. निवडणुकीचा माहोल असतानाही कारवाई सातत्याने सुरू आहे. काही नागरिकांकडून त्याच ठिकाणी पुन्हा जाहिराती केल्या जात असल्याने त्यांच्यावर पुन्हा कारवाई केली जाते.
- राजेश आगळे, उपायुक्त, आकाशचिन्ह परवाना विभाग, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

Toll Tax Rule Change : सरकारने बदलला टोल नियम!, आता अपूर्ण ‘एक्सप्रेस-वे’वर नाही होणार वसूली

Pune News : आयफोन विमा दावा नाकारल्याप्रकरणी ग्राहक आयोगाचा मोठा निर्णय; ८९ हजार परत करण्याचे आदेश

IND vs NAM : ७ षटकांत १०४ धावा चोपणारा भारत २०९ वर का अडकला? India vs Pakistan लढतीपूर्वी चिंता वाढवणारी गोष्ट

T20 WC IND vs NAM : इशान किशन, हार्दिक पांड्या बरसले, भारताने अनेक विक्रम नोंदवले; शेवटच्या १२ चेंडूंत ५ विकेट्स पडल्या

SCROLL FOR NEXT