पिंपरी-चिंचवड

सांगवडे पूल पाडल्याने पादचाऱ्यांची अडचण

CD

सोमाटणे, ता. १६ ः सांगवडे पूल अर्धवट पाडल्याने पादचाऱ्यांचा मार्ग बंद झाला असून सांगवडेहून मामुर्डीकडे जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
पूल धोकादायक झाल्याने सांगवडे-मामुर्डी पूल दुचाकी, चारचाकी वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यानंतर पर्यायी व्यवस्था म्हणून अनेक वाहनचालकांनी वाहन प्रवास बंद करून सांगवडे-मामुर्डी प्रवासासाठी या पुलावरून पायी जाणे सुरु केले होते. तर शेतीमाल विक्रेत्यांनी पुलाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी एक दुचाकी ठेवून शेतीमालाची वाहतूक सुरू केली होती. दरम्यान नवीन पुलाचे काम वेगात सुरू झाल्याने धोकादायक असलेला पूर्वीचा सांगवडे लोखंडी पूल अर्धवट पाडण्यात आल्याने आता हा रस्ता पादचाऱ्यांसाठीही बंद झाला आहे. पूल पाडण्याआधी पर्यायी व्यवस्था म्हणून पवना नदीत दगडमाती टाकून तातडीने तात्पुरता साकव तयार करणे गरजेचे होते. परंतु, संबंधित ठेकेदारांनी नदीत अर्धवट दगडमाती टाकून अर्ध्या भागापर्यंतच रस्ता केल्याने दोन्ही गावातील दळणवळण सेवा पूर्ण बंद आहे. दोन्ही गावांच्या दळणवळणसाठी संबंधित विभागाने तातडीने नदीतील अपूर्ण असलेल्या तात्पुरत्या रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी सरपंच रोहन जगताप यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

१९ चौकार, ६ षटकार... Vaibhav Sooryavanshi चा भाऊही घालतोय धुमाकूळ! दीडशतक ठोकल्यानंतर भावाची स्पेशल पोस्ट

Mumbai AC Local : खुशखबर! 'मरे'वर आणखी १२ एसी लोकल फेऱ्या; एकूण संख्या १२० वर

SCROLL FOR NEXT