पिंपरी-चिंचवड

सायन्स पार्कला विज्ञान सेतू फाउंडेशन पुरस्कार

CD

पिंपरी, ता. १६ ः विज्ञान पर्यटनासाठी चालना दिल्याबद्दल ‘विज्ञान सेतू फाउंडेशन –ब्रिजिंग सायन्स अँड सोसायटी’ मुंबई संस्थेद्वारे पिंपरी चिंचवड सायन्स पार्कला ‘विज्ञान सेतू फाउंडेशन पुरस्कार २०२५’ ने गौरविण्यात आले.
परस्परसंवादी विज्ञान दालनांचा विकास, खगोलशास्त्र कार्यक्रम, स्टेम कार्यशाळा, फिरते विज्ञान उपक्रम आणि मोठ्या प्रमाणावरील सामुदायिक संपर्क आदी उपक्रमांची दखल घेवून पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच श्रेणीमध्ये गुजरात सायन्स अँड टेक्नॉलॉजी (गुजकोस्ट)ला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे संस्थापक संचालक प्रवीण तुपे म्हणाले, ‘‘पुरस्कार सर्वसमावेशक व विज्ञान आणि समाज यांच्यात सेतू निर्माण करण्याच्या पिंपरी चिंचवड सायन्स पार्कच्या ध्येयधोरणांशी सुसंगत आहे.’’
पिंपरी चिंचवड सायन्स पार्कच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रद्धा खंपरिया म्हणाल्या, ‘‘पिंपरी चिंचवड सायन्स पार्क नावीन्यपूर्ण कार्यक्रमांच्या माध्यमातून सामुदायिक सहभागासाठी व्यासपीठ म्हणून यापुढेही उत्साहाने वाटचाल करीत राहील. पिंपरी चिंचवड सायन्स पार्क विद्यार्थी व जनसामान्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी व समाजातील सर्व घटकांसाठी विज्ञान सुविधा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Latest Marathi News Live Update: डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी बोगद्यामध्ये सुरक्षा दलांनी संयुक्त 'मॉक ड्रिल' (सराव) आयोजित केला

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

१९ चौकार, ६ षटकार... Vaibhav Sooryavanshi चा भाऊही घालतोय धुमाकूळ! दीडशतक ठोकल्यानंतर भावाची स्पेशल पोस्ट

Mumbai AC Local : खुशखबर! 'मरे'वर आणखी १२ एसी लोकल फेऱ्या; एकूण संख्या १२० वर

SCROLL FOR NEXT