पिंपरी-चिंचवड

शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटकपदी सौंदणकर

CD

पिंपरी, ता. १८ ः पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने संघटनात्मक पातळीवर मोठा आणि निर्णायक बदल केला आहे. शिवसेनेचे चिंचवड शहर विधानसभा संघटक संतोष रमाकांत सौंदणकर यांची पुणे जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेली ही नियुक्ती पक्षाच्या आगामी राजकीय रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
खासदार श्रीरंग बारणे यांनी चिंचवड येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सौंदणकर यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान केले. नवीन जबाबदारीनुसार सौंदणकर यांचे कार्यक्षेत्र पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघ असेल. संघटन बांधणी, बूथ पातळीवरील मजबुती, कार्यकर्त्यांचे नेटवर्क आणि निवडणूक नियोजन या सर्व बाबींची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे २०१७ च्या महापालिका निवडणुकीत तत्कालीन शिवसेनेचे ते प्रमुख रणनीतिकार होते. त्या निवडणुकीतील अनुभव, स्थानिक प्रश्नांची सखोल जाण आणि कार्यकर्त्यांशी असलेला थेट संवाद लक्षात घेता आगामी निवडणुकीची धुरा पक्षाने पुन्हा त्यांच्याकडे सोपवली आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohagad Murder Case: ''प्रतिष्ठेसाठी सियाने केतनला ठार मारण्याचा प्लॅन केला'', पोलिस चौकशीत चेतनचा धक्कादायक दावा

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा उद्या निकाल

SCROLL FOR NEXT