पिंपरी-चिंचवड

शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटकपदी सौंदणकर

CD

पिंपरी, ता. १९ ः पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने संघटनात्मक पातळीवर मोठा आणि निर्णायक बदल केला आहे. शिवसेनेचे चिंचवड शहर विधानसभा संघटक संतोष रमाकांत सौंदणकर यांची पुणे जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेली ही नियुक्ती पक्षाच्या आगामी राजकीय रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
खासदार श्रीरंग बारणे यांनी चिंचवड येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सौंदणकर यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान केले. नवीन जबाबदारीनुसार सौंदणकर यांचे कार्यक्षेत्र पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघ असेल. संघटन बांधणी, बूथ पातळीवरील मजबुती, कार्यकर्त्यांचे नेटवर्क आणि निवडणूक नियोजन या सर्व बाबींची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे २०१७ च्या महापालिका निवडणुकीत तत्कालीन शिवसेनेचे ते प्रमुख रणनीतिकार होते. त्या निवडणुकीतील अनुभव, स्थानिक प्रश्नांची सखोल जाण आणि कार्यकर्त्यांशी असलेला थेट संवाद लक्षात घेता आगामी निवडणुकीची धुरा पक्षाने पुन्हा त्यांच्याकडे सोपवली आहे.
-----

Baba Bageshwar warning : ‘’.. तर या देशातील हिंदू १९९२ ची पुनरावृत्ती करण्यास तयार आहेत’’ ; बाबा बागेश्वर यांचा इशारा!

मुंबईतील चाळीत राहणाऱ्या तीन मित्रांची धमाल गोष्ट; 'गोट्या गँगस्टर'चा ट्रेलर लाँच, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Ambegaon News : बिबट्याच्या दहशतीने आंबेगाव तालुक्यातील धार्मिक-सामाजिक जीवन ठप्प; भाविकांमध्ये भीतीचे सावट!

Solapur Political : जशा निवडणूका येतील तशी पात्र आणि चित्र बदलणारी चित्राताईं- भगीरथ भालके!

Pune Crime : तरुणीने केले जिवाभावाच्या मैत्रिणीवर चाकूने वार; कोरेगाव पार्क परिसरातील घटना!

SCROLL FOR NEXT