पिंपरी-चिंचवड

जुन्या भांडणातून तरुणावर प्राणघातक हल्ला

CD

पिंपरी : जुन्या भांडणाच्या रागातून एका टोळक्याने कोयता आणि दांडक्याने एका तरुणावर प्राणघातक हल्ला करून परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना जुनी सांगवी येथे घडली. या प्रकरणी प्रथमेश प्रशांत कवडे (रा. जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आयुष गोहिरे, विराज काटे, रितिकेश गोहिरे, सिद्धार्थ निकाळजे, सागर जगदनकर, आर्यन थोरात, रित्या गुरव यांना अटक केली आहे. तर हर्षद काटे, शुभम ढवळे, सार्थक कदम, साहिल पाटील, मयांक गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी आणि त्यांचा मित्र आदित्य गायकवाड हे सिक्यूएई येथील मुख्य प्रवेशद्वाराजवळ शेकोटी करून बसलेले असताना आरोपी दुचाकीवरून तिथे आले. गणेश बिरादार व आयुष गहिरे यांच्यात झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीला धमकावले. तर, आरोपी विराज याने फिर्यादीच्या डोक्यात कोयत्याने वार केला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला पकडून लाथा-बुक्क्यांनी, कमरेच्या पट्ट्याने आणि दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीच्या नातेवाईक महिलेला आणि मित्रालाही मारहाण केली. आरोपींनी हवेत शस्त्रे फिरवत परिसरात दहशत माजवली.

बनावट ऑर्डर बिले तयार करून फसवणूक
पिंपरी : ग्राहकांच्या नावे बनावट ऑर्डर बिले तयार करीत कंपनीचा माल परस्पर विकून एक कोटी एक लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना पिंपरी वाघरे येथील सी.जी. मार्केटिंग कंपनीत घडली. या प्रकरणी विवेक नामदेव चव्हाण (रा. चिखली) यांनी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनिल हिवरे (रा. चिखली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने कंपनीच्या ग्राहकांशी असलेल्या ओळखीचा फायदा घेतला. त्याने डिटर्जंट पावडर, शाम्पू, डायपर यांसारख्या वस्तूंची बनावट ऑर्डर बिले तयार केली आणि कंपनीतून माल घेतला. हा माल डिलिव्हरी बॉयच्या मदतीने इतर दुकानदारांना विकून कंपनीची आर्थिक फसवणूक केली.

रस्त्यालगत उभ्या ट्रकला दुचाकी धडकून तरुणाचा मृत्यू
पिंपरी : सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करून रस्त्यालगत उभ्या केलेल्या ट्रकला पाठीमागून दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मुंबई-बंगळूर महामार्गावरील पुनावळे येथे एच.पी. पेट्रोल पंपासमोर घडली. आदर्श मनोहर जगताप (वय २२, रा. लक्ष्मीनगर, पर्वती, पुणे) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी निखिल नितीन धनावडे (रा. पर्वती, पुणे) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ट्रकचालक चंद्रशेखर बाबासाहेब शिंदे (रा. प्रभात कॉलनी, वाकड) याला अटक केली आहे. फिर्यादीचे मित्र आदर्श हे दुचाकीवरून मुंबईकडून बंगळूरच्या दिशेने जात होते. दरम्यान, आरोपीने त्याचा ट्रक पुनावळे येथील एचपी पेट्रोल पंपासमोरील महामार्गाच्या डाव्या लेनमध्ये उभा केला होता. ट्रकची पार्किंग लाइट किंवा इंडिकेटर चालू नव्हते, तसेच तिथे कोणतेही रिफ्लेक्टर ठेवले नव्हते. यामुळे आदर्श यांची दुचाकी ट्रकला पाठीमागून जोरात धडकली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : विक्रीसाठी गांजा जवळ बाळगणाऱ्या एका तरुणाला चिंचवड पोलिसांनी अटक केली. ही कारवाई चिंचवड येथील बिजलीनगर पॉवर हाऊस परिसरात करण्यात आली. सलीम मोहम्मद बागवान (रा. शिवसाई कॉलनी, चिंचवडेनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सलीम याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २७ हजार रुपये किमतीचा गांजा सापडला.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT