पिंपरी, ता. २० : रिक्षाचे ऑनलाइन बुकिंग केल्यावरून एकाला बेदम मारहाण करून तीन हजार रुपयांची खंडणी मागण्यात आली. मावळ तालुक्यातील आंबी गावात हा प्रकार घडला. याप्रकरणी सुमीत रतन पटाईत (रा. आंबी) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मिथुन शेळके व साहिल वारींगे यांना अटक केली असून पवन पुयाद याच्यावर गुन्हा दाखल आहे. आरोपींनी फिर्यादीला जबरदस्तीने रिक्षात बसवले. त्यांना हाताने आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण तसेच शिवीगाळ करून आरोपींनी खंडणी मागितली.
-----------------