पिंपरी-चिंचवड

श्री फत्तेचंद जैन विद्यालयात गणित दिन उत्साहात साजरा

CD

पिंपरी, ता. २४ ः  श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री फत्तेचंद जैन विद्यालयात गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त गणित दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रा. सुनीता नवले यांनी अध्यक्षीय भाषणातून नऊ आकड्यांची गंमत विद्यार्थ्यांना सांगितली. तसेच जीवनाची दिशा ओळखणारी गणित भाषा किती महत्त्वाची आहे हे उलगडून सांगितले.
पर्यवेक्षिका मनीषा कलशेट्टी यांनी रामानुजन जादुई चौरसची माहिती सांगितली. यावेळेस इयत्ता सातवीतील प्रणव चिपटे, सहावीतील विघ्नेश दीक्षित व नवीतील अरहन गंगावणे या विद्यार्थ्यांनी गणित दिनाची माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे संयोजन कल्पना गोरडे, स्मिता सोनवणे व सर्व गणित शिक्षकांनी केले. प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका मनीषा जैन यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन वंदना पाटील, आभार प्रदर्शन पर्यवेक्षक राजेंद्र पितळीया यांनी केले. श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे ऑनररी जनरल सेक्रेटरी ॲड. राजेंद्रकुमार मुथा व सहाय्यक सेक्रेटरी प्रा. अनिल कुमार कांकरिया आणि पर्यवेक्षक संजीव वाखारे यांनी गणित दिनानिमित्त सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur News: पंढरपुरातील प्रस्तावित कॉरिडॉरला तीव्र विरोध; सुब्रह्मण्यम स्वामींच्या मोहिमेस पाठिंबा देण्यासाठी बाधितांचा शंखनाद!

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Solapur News: भारताच्या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोष; पाकिस्‍तानला लाेळविताच आतषबाजी, पेढे वाटून, तिरंगा उंचावून आनंदोत्सव साजरा!

AI in Finance : गुंतवणुकीसाठी ‘एआय असिस्टंट’

US Iran Tensions : अमेरिका कधीही सुरु करु शकते युद्ध, सैन्य तैनात करणे फक्त इशारा नाही, इराणला कोणी केले सावध ?

SCROLL FOR NEXT