पिंपरी-चिंचवड

कॉंग्रेसपुढे खाते उघडण्याचे आव्हान

CD

पिंपरी, ता. २६ ः पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थापनेपासून २००२ पर्यंत अर्थात तीन पंचवार्षिक निवडणुकांत एक हाती सत्ता मिळवणाऱ्या कॉंग्रेस पक्षाला शहरपातळीवर उतरती कळा आली आहे. २०१७ च्या निवडणुकीत एकही जागा पक्षाला मिळवता आली नव्हती. आता निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच शहराध्यक्षाने राजीनामा दिला आहे. २०१२ ते २०१७ च्या पंचवार्षिकमधील एका माजी नगरसेवकाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवाय, महाविकास आघाडीतील मित्र पक्ष आपापल्या सोयीनुसार स्वतंत्र भूमिका घेताना दिसत आहेत. त्यामुळे कॉंग्रेसपुढे खाते उघडण्याचे आव्हान असून, ते पेलण्यासाठी शहर पातळीवर सक्षम नेतृत्वाची गरज आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेची पहिली निवडणूक १९८६ मध्ये झाली. तेव्हापासून सलग तीनवेळा कॉंग्रेसने एकहाती सत्ता मिळवली होती. मात्र, २०१७ च्या निवडणुकीत पक्ष महापालिकेतून हद्दपार झाला. आता निवडणूक होऊ घातली आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, कॉंग्रेसच्या गोटात अद्याप शांतता आहे. शहर संघटनेत लक्ष घालणारे, कार्यकर्त्यांना बळ देणारे नेतृत्व पक्षाला हवे आहे. स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नसल्याने पक्षाला मरगळ आल्याचे चित्र आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह आहे. महाविकास आघाडीतील मित्र पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष राज्य व केंद्रातील महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जाण्याच्या तयारीत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत (मनसे) जाण्याचे संकेत आहेत. मात्र, शहरात उत्तर भारतीयांची संख्या अधिक असल्याने मनसेला सोबत घेणे कॉंग्रेसला परवडणार का? दोन्ही राष्ट्रवादी सोबत असल्यास जागांचे वाटप कसे करणार? असेही पेच आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे शहरातील कार्यकर्ते कान लावून बसले आहेत. परिणामी, जागा वाटप असो अथवा कुठून कसे लढायचे? याचा निर्णय होत नसल्याने अस्वस्थताही आहे.

कॉंग्रेसची वाटचाल
- पिंपरी चिंचवड महापालिकेची पहिली निवडणूक १९८६ रोजी झाली, तेव्हापासून सलग तीन निवडणुका जिंकून २००२ पर्यंत कॉंग्रेसची महापालिकेत सत्ता होती.
- १९९९ ला पक्षात फूट पडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उदय झाला. तरीही सत्ताधारी कॉंग्रेस पक्षच होता. प्रा. रामकृष्ण मोरे यांचे नेतृत्व होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर पक्षाला ठोस नेतृत्व मिळाले नाही. पक्षाला उतराई लागली. दरम्यानच्या काळात हर्षवर्धन पाटील यांनी काही महिने शहरात लक्ष घातले, त्यांनाही पक्षाला सावरण्यात यश आले नाही.
- २००२ च्या निवडणुकीत दोन क्रमांकाच्या जागा मिळवून कॉंग्रेस पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत सत्तेत होता. २००७ व २०१२ च्या निवडणुकीतही दोन क्रमांकाच्या जागा पक्षाने मिळवल्या होत्या. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद कॉंग्रेसला मिळाले होते. मात्र, पक्षाची उतरती कळा कोणीही थांबवू शकले नाही.
- २०१७ च्या निवडणुकीत एकही जागा न जिंकण्याची नामुष्की पक्षावर ओढवली. आता महापालिकेत पुनर्प्रवेशाची संधी असताना, कोणताही राज्यस्तरीय वा राष्ट्रीय नेता पक्षाकडे बघायला तयार नाही. स्थानिक नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याने निवडणुकीची कोणतीही तयारी अद्याप दिसत नाही.

महापालिकेत कॉंग्रेसची वाटचाल
निवडणूक वर्ष / एकूण जागा / कॉंग्रेसच्या जागा
१९८६ / ६० / २६
१९९२ / ७८ / ३३ (अपक्षांच्या मदतीने सत्तेत)
१९९७ / ७९ / ४६ (१९९९ पक्षात फूट, राष्ट्रवादीची स्थापना)
२००२ / १०५ / ३२ (राष्ट्रवादीसोबत सत्तेत सहभाग)
२००७ / १०५ / १९ (राष्ट्रवादीची सत्ता, कॉंग्रेस विरोधी पक्ष)
२०१२ / १२८ / १४ (राष्‍ट्रवादीची सत्ता, कॉंग्रेस विरोधी पक्ष)
२०१७ / १२८ / ०० (भाजपची सत्ता, राष्ट्रवादी विरोधी पक्ष)
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Rest House: बेड, फ्रिज, आरओ अन्... भारतीय रेल्वेची मोठी भेट; आधुनिक विश्रामगृह सुरू

दोन वर्षातून १ चित्रपट तरीही कोट्यवधींचा मालक आहे सलमान खान; कुठून होते अभिनेत्याची कमाई, वाचा साइड बिझनेसचं गणित

Kothrud News : कोथरूडमध्ये एकाच वेळी पाणी व वीजपुरवठा खंडित; नागरिकांचा संताप!

'धुरंधर'च्या यशामध्ये खऱ्या रहमान डकैतच्या मयतीचा व्हिडिओ व्हायरल; एन्काउंटरनंतर अशी होती परिस्थिती, मृतदेहाजवळ...

Latest Marathi News Live Update : जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ

SCROLL FOR NEXT