पिंपरी-चिंचवड

देहूत सोमवारपासून वृक्षदाई व्याख्यानमाला

CD

देहू, ता. २६ ः वृक्षदाई प्रतिष्ठान व देहू नगरपंचायत आणि देहू नगर पंचायत यांच्यावतीने २९ ते ३१ डिसेंबर दरम्यान वृक्षदाई व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. देहूतील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात दररोज सायंकाळी सहा वाजता व्याख्याने होणार आहेत, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे विश्वस्त शिवाजीराव मोरे यांनी दिली.
जागतिक तापमानवाढ, ओझोनचा हास, आम्लवृष्टी, सागरी प्रदूषण, नद्यांचे प्रदूषण आणि जैव विविधतेचा झपाट्याने होणारा ऱ्हास या पार्श्वभूमीवर पर्यावरणीय समस्यांबाबत प्रबोधन व्हावे, यासाठी पर्यावरणीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. सोमवारी (ता. २९) प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे हे ‘चला वृक्षारोपण करू, निर्सगाशी नाते जोडू’ या विषयावर पुष्प गुंफणार आहे. मंगळवारी (ता. ३०) प्रसिद्ध जलतज्ज्ञ सतीश खाडे हे ‘पाणी हेच जीवन’ या विषयावर तर बुधवारी (ता. ३१) सागर मित्र विनोद बोधनकर हे प्लॅस्टिक कचरा निर्मूलन सहभाग व चळवळ’ यावर व्याख्यान देणार आहेत.
यंदाचा ‘जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज वृक्षवल्ली सेवा पुरस्कार’ नाम फाउंडेशन संस्थेस आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्र्स्टचे अध्यक्ष सुनील रासने असणार आहे. तसेच ‘पद्मश्री डॉ. सु. वि. मापूसकर निर्मल सेवा पुरस्कार सेवा सहयोग फाउंडेशन संस्थेस खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT