पिंपरी, ता. २५ ः किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेड यांनी आपला ११ वा वेतन करार यशस्वीरीत्या पूर्ण केला. त्यातून किर्लोस्कर ऑईल इंजिन्स कंपनी कामगार कल्याण, औद्योगिक सौहार्द आणि शाश्वत विकासाच्या प्रति बांधील आहे. हा करार उत्पादकता वाढ, कर्मचाऱ्यांचे हित आणि कंपनीच्या यशाला चालना देणारा ठरेल, असे कंपनी व्यवस्थापनाने म्हटले आहे.
किर्लोस्कर ऑईल इंजिन्सचे वेतन करार २०११ मध्ये लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेले आहेत. या यशामध्ये व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वाची राहिली आहे. वेतन करार प्रसंगी कंपनीचे अध्यक्ष अतुल किर्लोस्कर, व्यवस्थापकीय संचालक गौरी किर्लोस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल सहाय, मुख्य मनुष्यबळ विकास अधिकारी जॉर्ज वर्गीस, मुख्य वित्तीय अधिकारी थी. सचिन केजरीवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी (संचालन) मकरंद जोशी, बीटूबी विभागाचे मुख्य मनुष्यबळ अधिकारी अमरजीत सिंग, उत्पादन विभागातील मनुष्यबळ विभाग प्रमुख वीरेंद्र गायकवाड, कारखाना व्यवस्थापक मिलिंद बोटे आणि आय. आर. व्यवस्थापक मधुकर गवस आदी उपस्थित होते. कामगार संघटनेच्यावतीने अध्यक्ष संजीव गायकवाड, उपाध्यक्ष राजेंद्र येडे, सचिव उल्हास खुटवड आणि कोषाध्यक्ष थी. विकास कोरे यांनी प्रतिनिधित्व केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.