पिंपरी-चिंचवड

सकाळ संवाद

CD

कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी
नवी सांगवीतील आदर्शनगर येथे शाळेचे आरक्षण असलेल्या मोकळ्या जागेत कचरा व राडारोडा टाकण्यात येतो. क्षेत्रीय कार्यालयात तक्रार केली असता. लेखी द्या, आमच्या हद्दीत हा भाग येत नाही अशी उत्तरे दिली जातात. या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी व डासांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाने येथे कचरा टाकण्यास बंदी असल्याचे फलक लावून कचरा टाकणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी.
- जितेंद्र आलसे, आदर्शनगर, नवी सांगवी

बसथांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय
हिंजवडी ते पुणे स्टेशन या मार्गावरील ३३३ नंबरची पीएमपीएमल बस पूर्वी पिंपळे निलख गावातून जात होती. मात्र, आता या बसचा मार्ग बदलला आहे. बससाठी गावात थांबा होता परंतु गावाबाहेर बस थांबा नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
- मोहन जगताप, पिंपळे-निलख

रस्त्यावरील ‘पार्किंग’मुळे अडथळे
दत्तनगर येथील थेरगावातील प्रसुनधाम समोरच्या रस्त्यावर अनेक वाहने बेकायदेशीररीत्या उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीसाठी अडचण निर्माण होत आहे. या वाहनांमुळे आजूबाजूचा कचरा गोळा करता येत नाही, त्यामुळे दुर्गंधी व रोगराईचा त्रास वाढला आहे. पालिकेने या समस्येची दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करावी.
- रमेश पाटील, थेरगाव

पदपथ खोदल्याने नागरिकांची गैरसोय

मागील दोन तीन महिन्यांपासून संत तुकारामनगर येथील मेट्रो स्टेशन बाहेरील पदपथ खोदून पुन्हा नवीन करण्याचे काम सुरू झाले आहे. हे काम सध्या बंद आहे. पिंपरी मेट्रो स्टेशन नंतर सर्वाधिक उत्पन्न देणारे स्टेशन म्हणून या स्टेशनचा नंबर लागतो, याचा अर्थ या स्टेशनवरील दैनंदिन प्रवासी संख्या जास्त आहे. या प्रवासींना पदपथावरून चालताना जीव मुठीत घेऊन स्टेशनवर जावे लागते. त्यामुळे प्रशासनाने येथील पदपथ त्वरित वापरण्यायोग्य करावे.
- योगेश शहा

रस्त्यावरील खासगी वाहनांमुळे अडथळा
थेरगाव येथील गुजर चौकातून डांगे चौकाकडे जाणाऱ्या वळणावर डाव्या बाजूला अस्ताव्यस्त पद्धतीने खासगी वाहने उभी असतात. येथे अधिकृत रिक्षा स्थानक नाही. वळणावर उभ्या असलेल्या रिक्षामुळे इतर वाहनांना अडथळा होतो. यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या वाहनांवर प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी.
- किरण येवलेकर, चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon News : जळगावकरांचा श्वास कोंडला! महामार्गावर धुळीचे लोट, 'न्हाई'च्या अधिकाऱ्यांचे कंत्राटदारांकडे बोट

Nashik Municipal Election : नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेचे 'मिशन डॅमेज कंट्रोल'; फोडाफोडीनंतर अनिल देसाईंनी फुंकले रणशिंग!

Latest Marathi News Live Update : अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची बंगळुरूत धडक कारवाई

Phulambri Housing Scheme : आधार पडताळणी अडकल्याने १११ लाभार्थ्यांचे घरकुल रखडले; निवाऱ्याची चिंता कायम!

Viral: जिथे माणसांपेक्षा मांजरींचं होतं राज्य, तिथं ३० वर्षांनी बाळाचा जन्म, शांत गावात आनंदाची चाहूल

SCROLL FOR NEXT