पिंपरी, ता.२७ ः श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त वाल्हेकरवाडी येथील स्वामी समर्थ मंदिरामध्ये ३१ मार्चपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुलीलामृत पोथीचे पारायण, अभिषेक, भजन, कीर्तन असे कार्यक्रम पार पडतील. सोमवारी (ता.३१) श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाला पहाटे लघुरुद्र व होमहवन होईल. त्यानंतर प्रशांत महाराज बरिदे यांचे कीर्तन होईल. १२.३० वाजता स्वामी समर्थांचा जन्मसोहळा पार पडेल. त्यानंतर महाआरती व महाप्रसादाचे वाटप होईल. सायंकाळी स्वामी समर्थांची पालखीतून मिरवणूक काढली जाईल. त्यानंतर भजनी संध्या या कार्यक्रमाने सोहळ्याची सांगता होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.