‘अनक्लॉग’ला लोकप्रतिनिधींचाही पाठिंबा
हिंजवडीचा पिंपरी चिंचवड महापालिकेत समावेश व्हावा, यासाठी आयटीयन्सकडून सुरू करण्यात आलेल्या मोहिमेला शहरातील लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दिला आहे. आमदार महेश लांडे, आमदार शंकर जगताप यांनी आपल्या एक्स हॅंडलद्वारे या मोहिमेला पाठिंबा दर्शविला आहे. हिंजवडी येथील अपुऱ्या पायाभूत सुविधा ही एक गंभीर समस्या असून, या संदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी हिंजवडीचे पिंपरी चिंचवडमध्ये समावेश करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या मोहिमेमध्ये अद्यापपर्यंत जवळपास २० हजार नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला असून, आठवड्यांच्या शेवटी या सह्यांचे अर्ज घेऊन आपण मुख्यमंत्र्यांपुढे ही मागणी मांडणार असल्याचे याचिकाकर्ता सचिन लोंढे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.